मोदींचे मोहक भाषण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. मोदी आपल्या भाषण कौशल्यावर सदैव जनमनाचा ठाव घेतात, हे देशाने अनुभवले आहे. कालच्या राहुल गांधी यांच्या खरमरीत भाषाणानंतर आज पंतप्रधान काय बोलतात यावर केवळ भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले होते. आपल्या नेहमीच्या शैलीने भाषण करून पंतप्रधानांना जे सांगायचे होते ते त्यांनी समर्पक शब्दांत सांगून टाकले. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. यावरून ती टीका आम्हाला बिनमहत्त्वाची वाटते, हे त्यांनी दाखवून दिले. निवडणूक निकाल नेहमीच आमच्या बाजूने लागतात. विरोधक ईडीच्या बाबतीत वारंवार आमच्यावर टीका करतात. मात्र हे विरोधक कधीच एकत्र येऊ शकलेले नाहीत. आम्ही जी जी ईडीची कारवाई केली त्यामुळेच आता विरोधी पक्ष एकसुराने बोलायला लागले आहेत. त्यामुळे ईडी त्यांच्या ङ्कायद्याची ठरली आहे. मनमोहन qसग यांच्या दहा वर्षांच्या काळात घोटाळ्यांची कारकीर्द होती. आम्ही मात्र प्रत्येक संकटाला संधी समजून देशाच्या महाविकासाला महत्त्वाचे मानले. राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला आणि आदिवासी समाजाचाही अपमान केल्याचे ते म्हणाले. आज भारतात प्रत्येक स्तरावर विकासाचे दर्शन होते. ज्याला हा विकास दिसत नाही तेच आमच्यावर टीका करतात.

काँग्रेसचे पतन होत आहे मात्र हे स्वीकारायला काँग्रेस तयारच नाही. काँग्रेसने जम्मू-काश्मिरात तिरंगा ङ्कडकविल्याचे मोठ्या थाटामाटात सांगितले. पण आम्ही जम्मू-काश्मिरात अशी परिस्थिती निर्माण केल्यामुळेच लाल चौकात झेंडा ङ्कडकविता आला आहे, असे मोदी म्हणाले. आता देशवासियांचा आमच्यावरील विेशास अजून वाढला आहे. आम्ही देशाच्या जनतेसाठी, देशाच्या भविष्यासाठी आपले प्राण अर्पण करायलाही तयार आहोत. आम्हाला शिव्या देणाèयांनाही हे समजले पाहीजे की, जनतेचा आमच्यावर विेशास आहे. आज आम्ही ८० कोटी भारतीयांना मोङ्कत रेशन देत आहोत. अकरा कोटी शेतकèयांच्या खात्यात वर्षातून तीनदा पैसे जमा केले जातात. पंतप्रधानांनी आज आपल्या सर्व आयुधांचा उपयोग करत विरोधकांचे सर्व आरोप ङ्केटाळले. पंतप्रधान मोदी भाषाप्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध आहेत.

२०१४ पूर्वी देश विकासापासून वंचित होता. आम्ही विकासाची घौडदौड दाखवून दिली आहे. स्थिर शासन देणारे आम्हीच आहोत. अनेक दशकांनंतर सरकारला बहुमत मिळाले आहे, याचाही उल्लेख त्यांनी केला. आपल्या कारकिर्दीतील अनेक विशिष्ट गोष्टींचा त्यांनी उल्लेख करून विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. पंतप्रधानांनी राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना जराही महत्त्व न देता ते सगळे आरोप कवडीमोलाचे आहेत, असे दाखवून दिले. एकूणच पंतप्रधानांचे भाषण त्यांच्या नेहमीच्या शैलीला अनुरूप असेच होते. देशाला मोहीत करण्याची कला त्यांना अवगत आहे. यामुळेच विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याला समर्थपणे प्रतिउत्तर देण्याचे कार्य ‘मोदी है तो मुमकीन है‘ याप्रकारे केले आहे. आज भारतीय जनता पक्षाचे तारणहार म्हणून पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख केला जातो. याचे कारण बहुधा हेच असावे. कोणत्या प्रश्नाला बगल द्यावी आणि विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यावे, याची संपूर्ण तयारी वर्षानुवर्षे मोदी यांनी केलेली दिसते. आजचे त्यांचे भाषण असेच दणकेबाज झाले यात वाद नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *