२४ जानेवारीपासून अदानी हा विषय भारतभर चर्चेत आहे. अदानींच्या शेअर्सची qकमत अतिशय खालच्या पातळीवर गेली आहे. विरोधी पक्ष अदानी यांच्यावर जबरदस्त हल्ले चढवत आहे. अदानी यांच्याबरोबर सत्ताधाèयांवरही हल्ल्यांवर हल्ले होत आहेत. विरोधी पक्षांनी व विशेषतः काँग्रेसने प्रश्नांची मालिकाच सुरू केली आहे. पण काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा मौन राहिलेले बरे अशीच सरकारची भूमिका आहे. अदानींचे शेअर्स घसरल्यामुळे अदानींचे काय होईल, यापेक्षा ज्या शेअरधारकांनी मोठ्या विेशासाने आपली कमाई अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवली आहे, त्यांनी गुंतवलेल्या रकमेपेक्षा आजची त्यांची बाजारभावाची qकमत ङ्कारच कमी झालेली आहे. प्रश्न असा आहे की, या बिचाèया भागधारकांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. अदानी यांनी पद्धतशीरपणे योजना आखून आपल्या शेअर्सची qकमत वाढवून घेतलेली आहे. या वाढीव qकमतीवर अदानी यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे. पण या शेअर्सची qकमत आज तरी तोटा देणारी ठरलेली आहे. आताच्या परिस्थितीत या कंपनीचे शेअर घेण्यासाठी कुणीच तयार नाही.
अदानी यांची जवळपास प्रत्येक क्षेत्रात दहशत आहे. विदेशी कंपन्या व बँका एवढे विरोधी बोलूनही अदानी यांचे साम्राज्य पुन्हा भरभराटीला येईल, असा विचार सर्वच शेअरधारक करता आहेत. सध्यातरी कोणतीही बँक अदानीला कर्ज देईल, असे वाटत नाही. मग अदानी यांचे साम्राज्य कसे सावरेल, हाच मोठा प्रश्न आहे. भारताच्या इतिहासात एवढे मोठे आर्थिक घसरणीचे प्रकरण अजून तरी अस्तित्वात आलेले नव्हते. आता सरकार संपूर्ण शक्तीनिशी त्यांच्या मागे उभे आहे, हे उघड आहे. यामुळे आता पुढील काही दिवसांत अदानी यांच्या शेअर्सचे मूल्य वाढते की काय अशा आशेवर दिवस कंठीले जात आहेत. अदानीच्या सुसाट धावणाèया नदीचे पुढे काय होईल, हे कळणे सध्यातरी शक्य नाही. यामुळेच अदानी यांच्या शेअरला सध्या भाव मिळत नसला तरी अदानी सध्या स्थिप्रज्ञासारखे वागत आहेत. त्यांना अशी आशा आहे की, आज ना उद्या त्यांची बाजारातील पत पुन्हा परत मिळेल. अदानीच्या आशेवर आपण कशाला पाणी टाकायचं? अदानी यांचा म्हणजे त्यांच्या शेअर्सधारकांचा विजय होवो, अशी आशा आपण करूया.