मार्च एंडिंगचा ‘महाधडाका’; सुटीच्या दिवशीही वाजणार नोंदणीचा चौघडा! घर खरेदीदारांसाठी म्हाडा-सिडकोच्या धर्तीवर सरकारचा मोठा निर्णय!
विशेष प्रतिनिधी:मुंबई: आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मालमत्ता खरेदी-विक्रीचा ओघ वाढणार असल्याचे ओळखून राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मार्च अखेरची कामे पूर्ण करण्यासाठी आणि महसूल वसुलीचा इष्टांक गाठण्यासाठी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक…
७/१२ उताऱ्यात महाघोटाळा: १.५ लाख शेतकऱ्यांची फसवणूक; महसूल विभागाचा अजब कारभार उघड
महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडवून देणारा एक अत्यंत गंभीर आणि मोठा गैरप्रकार समोर आला असून, जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या ७/१२ उताऱ्यात बेकायदेशीर फेरफार करून तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द सरकारने दिली आहे….
जनतेचे सेवक आहोत याची सर्वसामान्यांना प्रचिती देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा प्रारंभ
लोककल्याणकारी उपक्रमासाठी प्रशासनाने उत्स्फूर्त पुढाकार घ्यावा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे १५ पेक्षा जास्त प्रमुख सेवा थेट शिबीर स्थळी देण्याचे उद्दिष्ट नागपूर, दि. ७ :- राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला महसूल विभागाशी असलेल्या सेवा तत्परतेने मिळाव्यात, तहसील कार्यालयात गावपातळीवरील खेटे मारण्याची वेळ…



