भाजपच्या गडाला खिंडार, कसब्यात ११ हजार मतांनी धंगेकर विजयी

पुणे, दि.०२। प्रतिनिधी कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. कसब्यात यंदा भाजप आणि मविआमध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. जनतेचा माझ्यावर विेशास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

ज्या दिवशी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपला ४० स्टार प्रचारकांची फौज पाठवावी लागली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी उतरावं लागलं होतं. त्याचवेळी मी निवडणूक जिंकलो होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा जनतेचा विजय आहे, असंही ते म्हणाले. रवींद्र धंगेकर हे भाजपचे हेमंत रासणे यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. प्रदीर्घ काळापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्याकडे तगडे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला होता. धंगेकर तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विेशासू राहिले आहेत. रविंद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *