ज्याच्या सोबत महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला
विराट जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अकोल्यात ठासून विजय मिळणारच चा केला विश्वास व्यक्त
विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले जसा कहानी मध्ये पोपटात जीव असतो तसा स्वतःला वारस समजणारांचा मुंबई जीव अडकला आहे
अकोला – अकोला शहराला सुंदर आणि विकसित शहर करण्याचे आमचे स्वप्न आहे त्यासाठी शिवसेनेला संपूर्ण सत्ता दिली तर शहराच्या विकासाला निधी आणि इच्छशक्ती दोन्ही कमी पडू देणार नाही असे अभिवचन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विराट जाहीर सभेत बोलताना अकोलेकरांना दिले.
अकोला महापालिकेतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज जुन्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विराट जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महायुती सरकार मध्ये असताना त्यांनी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजना ही कोणीही बंद करू शकणार नाही त्यासाठी विरोधक कोर्टात गेले तरीसुद्धा ही योजना आम्ही बंद होऊ दिली नाही व केव्हाच बंद होणार नाही. तसेच आता लाडक्या बहिणीला लखपती करायचा आहे येथील युवकांचा सर्वांगीण विकास करायचा आहे त्यासाठी अनेक योजना आपण आणल्या आहेत त्याचा उल्लेख करीत तुम्ही शिवसेनेला अकोल्यात सत्ता सोपवा बाकी काळजी मी करेल असा शब्द दिला.
अकोला शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी खाती शिवसेनेकडे असून एकदा आमच्यावर विश्वास टाकून बघा ,शहराचा कायापालट करण्याचा माझा शब्द असल्याचे शिंदे मी,म्हणाले. यावेळी अकोला शहरासाठी शिवसेनकडून स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेल्या वचननाम्याचे लोकार्पण त्यांनी करीत या वचनाम्यात उल्लेख असलेल्या सर्व बाबी सतत आल्यास पूर्ण करण्याचे वचन दिले.
अकोल्यात तुम्ही आजपर्यंत सगळ्या पक्षांना संधी दिली आहे आता फक्त यावेळी एकवेळ शिवसेनेला सेवेची संधी देऊन बघा ,शहराच्या योजनाबद्ध विकास करण्यावर आमचा भर राहील,गेली अनेक वर्ष आपण नगरविकास खाते सांभाळत असताना या शहराच्या विविध योजनांसाठी निधी देण्याचे काम केलं आहे ,अकोल्याच्या सगळ्या प्राथमिक समस्या आणि गरज याची आपलयाला जाणीव आहे ,त्यासाठी काम करणारी मोठी टीम आमच्याकडे आहे ,आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत ,त्यामुळे हा तुमचा भाऊ जे बोलतो ते जिवाची बाजी लावून करून दाखवतो याची खात्री बाळगा असेही आवाहन त्यांनी केले.
आजवर ज्यानी सत्ता भोगली त्यांनी साधे पिण्याचे पाणी सुद्धा नियमित दिले नाही मग ते तुमचा विकास काय करणार असा टोला शिंदे यांनी भाजपला मारीत ज्यांनी तुम्हाला पाच दिवसांनी पाणी दिले त्यांना पाणी पाजून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा यावेळी परिवर्तन घडविण्यासाठी महापालिकेवर सेनेचा भगवा फडकवा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझी आ. गोपिकीशन बाजोरिया यांनी केले.सभेला केंद्रीयमंत्री ना.प्रतापराव जाधव,ना. संजय राठोड,निरीक्षक मा.आ.श्रीकांत देशपांडे ,शशिकांत खेडेकर ,उपनेते गोपीकिशन बाजोरिया ,जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख अश्विन नवले,मा. आ. नारायणराव गव्हाणकर,पांडे गुरुजी, विठ्ठल सरप पाटील, योगेश अग्रवाल .डॉ दीपक केळकर, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई वीरक,रेखाताई राऊत शहरप्रमुख राजेश मिश्रा,वैभव चौधरी,रमेश गायकवाड,तरुण बगेरे, यांचे सह महानगरपालिकेमध्ये उभे असलेले शिवसेनेचे सर्व उमेदवार व शहरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन योगेश अग्रवाल यांनी केले. तर आभार उषाताई विरक यांनी मानले.




