अकोला विमानतळाला संत गजानन महाराजांचे नाव देण्याची खा अनुप धोत्रे यांची केंद्राकडे मागणी
अकोला :विदर्भाची पंढरी संत नगरी अकोल्यापासून 45 किलोमीटर दूर असून विदर्भ पश्चिम विदर्भाची ओळख संत गजानन महाराज यांच्यापासून असून मोठ्या प्रमाणात अकोल्यातून विमान सेवा सुरू झाल्यावर भाविक भक्त मोठ्या प्रमाणे येणार असून अकोला विमानतळाला संत गजानन महाराज विमानतळ हे नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांना केली.
संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे मोठ्या प्रमाणात मुंबई आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात उत्कृष्ट व्यवस्थापन सोबत मानवतेच्या कार्यामुळे संत गजानन महाराज संस्थेचे नाव सर्वदूर असून अकोल्यातील मोठ्या प्रमाणात भावीक भक्त दर गुरुवारी मोठ्या संख्यातून जात असतात आणि अकोले करांच्या असंख्य नागरिकांची मागणी आहे की संत गजानन महाराज विमानतळ हे नाव देण्यात यावं आणि या दृष्टीने राज्य शासनाला सूचना देण्यात यावा व यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा खासदार अनुप धोत्रे यांनी मागणी केली असून महाराष्ट्र सरकार या संदर्भातला ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवल्यास तरी त्वरित कारवाई करून भावी भक्तांच्या भावना जपण्यातील असे अभिवचन नामदार मुरलीधर मोहोळ यांनी देऊन आपण स्वतः गजानन भक्त असून अनेक विदर्भातील नागरिक पुण्यात असून त्यांचा पाठिंबा आपल्याला असल्याची सांगून त्यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुरावा बद्दल अभिनंदन करून राज्य शासनाने विमानतळ विस्तारासाठी जमीन अधिकरणाचा काम सुरू केले असून जिल्हाधिकारी वर्षाताई मीना यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे आणि लवकरच 18 मीटर रुंदीची धावपट्टी च काम सुरू होईल असाही विश्वास करून यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन सुद्धा नामदार मुरलीधर मोहोळ यांनी खासदार अनुप धोत्रे यांना दिले.
विशेष पायलट प्रशिक्षण केंद्र संदर्भात सुद्धा कारवाई सुरू असल्याची त्यांनी सांगून छोटीशी विमानसेवा संदर्भात सुद्धा अनेक कंपन्याशी चर्चा सुरू असल्याची त्यांनी सांगितले




