मौदा : मौदा नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पीठासीन अधिकारी पल्लवी राऊत तथा मुख्याधिकारी विवेक मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष प्रसन्न तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत नगरपंचायतीच्या सर्व सहा विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे नगरपंचायतीवर काँग्रेसचे स्पष्ट वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
सभेच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अधिकृत निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी उपाध्यक्ष शुभम तिघरे यांची निवड करण्यात आली असून सदस्य म्हणून कल्पना बारई, दीपक कुंभरे, उमेश गभने व मोरेश्वर सरोते यांची निवड झाली आहे.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतिपदी रंजना धनजोडे यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून प्रियंका काळमेघ, दामिनी साठवणे, राजकुमार सोमनाथे व पद्मावती चलसानी यांचा समावेश आहे. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतिपदी तारकेश्वरी बारापात्रे यांची निवड करण्यात आली असून, कल्पना बारई, दीपक कुंभरे, रमेश कुंभलकर व राजकुमार सोमनाथे सदस्य असतील. पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी शरद सावंग यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून रंजविता गजभिये, आशिष काटकर, मोरेश्वर सरोते व उमेश गभने यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी अनिता भंडारी यांची निवड झाली असून, प्रियंका काळमेघ, दामिनी साठवणे व दीपिका पोटभरे सदस्य असतील.
मुख्याधिकारी विवेक मेश्राम सभापती रंजना थनजोडे, प्रियांका काळमेघ, दामिनी साठवणे




