अर्थ टॉप स्टोरी नागपूर विदर्भ

अ‍ॅडव्हांटेज विदर्भमध्ये सहभागी होणार २३ देशातील राजदूत व व्यापार प्रतिनिधी:विदर्भात रोजगाराची मोठी संधी

नागपूर : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाºया अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२६ – खासदार औद्योगिक महोत्सवातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेकरिता प्रथमच २३ हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून विदर्भातील आणि स्थानिक उद्योगांना निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हॉटेल तुली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काळे म्हणाले की, विदर्भाच्या औद्योगिक विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवण्यासाठी अ‍ॅडव्हांटेज विदर्भ आहे. विकासाला बळ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव भारताच्या औद्योगिक नकाशावर विदर्भाला एक सक्षम व उदयोन्मुख केंद्र म्हणून अधोरेखित करणार आहे. या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे उद्घाटन शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी ५ वाजता दक्षिण आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, रशिया, चीन तसेच आफ्रिकी देशांवरील विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांमध्ये संबंधित देशांचे राजदूत अथवा व्यापार प्रतिनिधी त्यांच्या देशातील गरजा, आयातक्षम वस्तू आणि व्यवसायाच्या संधींबाबत विदभार्तील उद्योजकांना मार्गदर्शन करतील.
परिषदेत रशिया, चीन, ब्राझील, इजिप्त, टोगो, गयाना, बेनिन, उरुग्वे, नायजेरिया, झांबिया आणि व्हेनेझुएला यांच्यासह एकूण २३ देशांचा सहभाग राहणार आहे. सध्या या देशांमध्ये भारतातून, विशेषत: विदभार्तून कृषी क्षेत्रातील तांदूळ, वीज वहन मनोरे, वस्त्रोद्योगातील सूत तसेच पोलादाची निर्यात केली जाते. या वस्तूंच्या नियार्तीत वाढ होण्यासोबतच नव्या उत्पादनांसाठीही संधी उपलब्ध होतील.

या परिषदेच्या माध्यमातून विदभार्तील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी थेट संवाद साधून आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा मार्ग खुला होईल. त्यातून या भागात मोठ्या प्रमाणावर सगळ्याच क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असेही काळे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अशोक गोयल, अनूप खंडेलवाल, संजय गुप्ता, राजेश बागडी, राजेश रोकडे, रिना सिन्हा आणि शिवराव उपस्थित होते.

विशेष आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना यापूर्वी तयार करण्यात येणारे संगणक कार्यक्रम केवळ नियार्तीसाठीच वापरता येत होते. देशांतर्गत वापरासाठी त्यावर मयार्दा होत्या. ही अडचण असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात आवश्यक सुधारणा झाल्याने आता हे संगणक कार्यक्रम देशांतर्गत वापरासाठीही उपलब्ध होऊ शकेल.
या बदलामुळे विदर्भातील लहान माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर विदर्भात बºयाच लहान आयटी कंपन्या आहेत. त्यांना अ‍ॅडव्हांटेज विदर्भच्या माध्यमातून येथे येणाºया २५ विकसनशील देशांमध्ये या क्षेत्रात व्यवसायवृद्धीच्या मोठ्या संधी असल्याचेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *