कु.चंचल पितांबरवाले,अकोट : वसुंधरा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित वसुंधरा इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी यादरम्यान रौप्य महोत्सवाचे बहारदार आयोजन करण्यात आले.
या महोत्सवात संस्थेला तसेच ज्ञानपीठास ज्यांनी ज्यांनी बहुमूल्य योगदान देऊन संस्थेला नावलौकिक मिळवून दिला, त्यांचे मनःपूर्वक कौतुक नि आभार व्यक्त करताना आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रसिद्ध वैदर्भीय कवी माननीय श्री. विठ्ठल कुलट सर यांनी ह्रदयस्पर्शी मनोगतातून उपस्थित मान्यवर, पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच नागरिकांना शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक बहारदार कवितांनी मंत्रमुग्ध केले.
यावेळी नगराध्यक्ष मायाताई धुळे यांनी वसुंधरा ज्ञानपीठाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच इतर ऍक्टिव्हिटींचा भाषणातून मुक्तकंठाने गौरव केला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी सचिव वसंतरावजी पुंडकर, काशीरामजी साबळे, डॉ.राजेश मोडशे,अरुणजी सांगळोदकर,अरविंदजी लहाने, सिंधुताई धांडे, प्रशांतजी वाघ,अॅड.अतुल सोनखासकर तसेच पालक प्रतिनिधी पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम,स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र इत्यादी बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.बक्षीस समारंभानंतर शालेय विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे प्राचार्य शिवशरण नारे यांनी प्रास्ताविक केले.पर्यवेक्षक संजय वाकडे सर व प्रज्ञा पुंडकर मॅडम यांनी संचालन केले.स्मिता कुलट मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.




