बुलढाणा

अज्ञात वाहनाच्या धडकेने पातुर्डा येथील पातुर्डा येथील तरुण महिला शिक्षिकेचा मृत्यू 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार . वृत्तलिहिपर्यंतही गुन्हा दाखल झाला नाही. संग्रामपूर(रामेश्वर गायकी)ः- तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका महिलेचा जळगाव (जा.) तालुक्यातील चावरा (सखारामपूर)फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात मृत पावल्याची घटना आज ऐन होळी सणाचे दिवशी २/ मार्च रोजी सकाळी ७…

विवेकानंद सार्व वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन संपन्न

विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रुस्तमजी होनाळे हे उपस्थित होते. ते आपले विचार मांडताना म्हणाले अमृताची पैज जिंकेल अशी समृद्ध आपली…

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री

बुलढाणा, (जिमाका)दि. २६ : स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव २०२५’ चा मोठ्या उत्साहात समारोप झाला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथदिंडीने…

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी

बुलढाणा, दि. 27 (जिमाका): बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविली जाते. यानुसार दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भावी इच्छुक माता-पिता बालक दत्तक घेऊ शकतात, असे…

8 मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतला तयारीचा आढावा

बुलढाणा, (जिमाका)दि. 27 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील अमडापूर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मौजे अमडापूर देवी संस्थाच्या परिसरात 8 मार्च रोजी…

औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ बुलडाणा, दि. २५ : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या’ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन–प्रशासनाचा…

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ:औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बुलडाणा, दि. २५ (जिमाका): आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या’ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन–प्रशासनाचा उपक्रम न राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती…

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज शेगाव येथे करणार राष्ट्रीय आरोग्य मेळावा-2026 चे उद्घाटन

बुलढाणा, दि. 24(जिमाका) : भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसांचा “राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026” आयोजित करण्यात आला आहे. औषधी वनस्पती लागवड आणि…

जिल्हा परिषदेत राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबाच्या शिल्पाचा अनावरण

शिव जयंती सोहळा; शाहिरी जागर बुलढाणा (जिमाका),दि.१७ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती पर्वावर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्याचे…

ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; नागरिकांनी नोंद घ्यावी

बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : माहे जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाच्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर कार्यपद्धती व…