सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर:९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ;ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी
सातारच्या ऐतिहासिक भूमीतून थेटअजित जगताप… असं म्हणतात की, इतिहास मनगटांच्या रगीमधून लिहिला जातो, इतिहास काळजाच्या धगी मधून लिहिला जातो. धर्म, जात, प्रांत, पंथ यांना गाडून विश्वबंधुत्वाचा इतिहास सांगणाऱ्या संतांच्या अनमोल वाणीला स्मरून इतिहास रचणारा सातारा जिल्हा आहे. थेट छत्रपती शिवरायांची…
मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा मुहूर्त ठरला; ३ जानेवारीला पहिली जाहीर सभा, वरळी डोम ठरणार राजकीय रणांगण
विशेष प्रतिनिधी :मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने अखेर प्रचाराचा बिगुल फुंकला आहे. मुंबईतील महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत मुहूर्त ठरला असून, ३ जानेवारी रोजी पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेने मुंबईतील निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात होणार असून, राजकीय वातावरण अधिक तापण्याचे…
दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा:सचिव तुकाराम मुंढे
मुंबई, दि. १ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे…
ठाकरेंना भिडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या लेकाचा विजय निश्चित? सेना–मनसेचा उमेदवारच नाही, मुलुंडमधून मोठी राजकीय अपडेट
विशेष प्रतिनिधी :महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपकडून सर्वात आक्रमक भूमिका कुणी घेतली असेल, तर ते नाव म्हणजे किरीट सोमय्या. ठाकरे कुटुंबाशी थेट भिडणारे, आरोपांच्या फैरी झाडणारे आणि आघाडी सरकारविरोधात जणू मोहीमच उघडणारे किरीट सोमय्या एकटेच होते,…
मुंबईत ठाकरे विरुद्ध युतीत थेट लढत; ‘वंचित’च्या माघारीने विरोधकांची मतविभागणी टळली
विशेष प्रतिनिधी :मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणावर आता राजकीय पट स्पष्ट होत चालला आहे—आणि या पटावर काही प्रभागांत तिसऱ्या खेळाडूस जागाच उरलेली नाही. २२७ पैकी किमान ३२ प्रभागांत काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचा उमेदवारच नसल्याने येथे थेट सामना रंगणार आहे—भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती विरुद्ध…





