टॉप स्टोरी महाराष्ट्र

पिंपळपानावर चित्र साकारत पत्रकाराकडून दर्पणकरांना आदरांजली

तळमावले/वार्ताहर:महाराष्ट्र राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 6 वेळा गौरवलेले पत्रकार शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी डाकवे यांनी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणी, पोस्टर, रांगोळी, ठिपके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींची नावे, पेपर कटींग आर्ट, टूथ ब्रश स्प्रे इ. माध्यमातून दर्पणकारांची सुंदर चित्रे साकारली आहेत.

विविध माध्यमात कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी पिंपळपानाचा नको असणारा भाग कापून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पिंपळाचे पान, पेन्सिल, ऑपेरेशन ब्लेड, इ. साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती रेखाटत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यापूर्वी त्यांनी पिंपळपानावर माजी कृषी मंत्री खा.शरद पवार, गौतम बुध्द, आण्णा भाऊ साठे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन व अन्य मान्यवर यांच्या कलाकृती साकारल्या आहेत.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पिंपळपानावर केलेल्या चित्राची परिसरातून प्रशंसा होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *