नागपूर जिल्हा रामटेक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालयाला तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त

रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक येथील नावाजलेली व सर्वात जुनी शाळा असलेली रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालयाला वर्ष २०२४ – २५ चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन चा रामटेक तालुका मधून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सदर पुरस्कार रक्कमेचे चे धनादेश वितरण माननीय राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते पार पडले.यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,नलीनी चौधरी,नगरसेवक सुमित कोठारी,प्रभाकर खेडकर,आलोक मानकर सह आदी उपस्थीत होते.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा द्वारा आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळेत राबविल्या जाते. या अभियानात पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादनूक या आधारावर गुणांकन केले जाते. वरील सर्व मुद्द्यावर नगरपरिषद विद्यालय ही तालुक्यातून प्रथम ठरली आहे.

ही शाळा इंग्रज कालीन असून या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. शाळा भौतिक सुविधेने उत्तम असून शाळेचे शंभर टक्के डिजिटलायझेसन झालेले आहे. प्रत्येक वर्गात इंटरॲक्टिव्ह बोर्ड असून संगणक, रोबोटिक व अटल लॅब तसेच एपीजे अब्दुल कलाम इनोव्हटिव्ह लॅब या अत्याधुनिक प्रयोगशाळा मुळे विध्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण दिले जाते.या शाळेतील विविध उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्तेमुळे ही शाळा आज नावारूपाला आली आहे.

नगरपरिषद च्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद चोपकर, अभियान प्रमुख सुनील पवार तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले. या निधीतून शाळेच्या विविध शैक्षणिक, भौतिक व शाळा रंगरंगोटी चे कामे करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांची कल्पकता आणि परिश्रम फार महत्त्वाचे ठरले. यात शिक्षक प्रकाश उके , मीनाक्षी खैरकर, मिना खोडके, स्वाती खैरकर, लांडगे,हडपे, दामेधर,भेंडारकर, स्वाती जांबुळे, सचिन नाईक, गवई , बांगडकर क्रीडा प्रमुख दुष्यन्त कारामोरे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *