मी स्वत:वर फायरिंर्ग करून घेईन; महेश अहिरांचे कथित रेकॉर्डिंग व्हायरल

मुंबई, दि.१५। प्रतिनिधी ठाण्याचे सहाय्यक आयुक्त महेश अहीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी असे ट्विट केले आहे. या कथित ऑडिओमधील व्यक्ती मी स्वतःवर फायरिंर्ग करून घेईन, माझ्यामागे मुख्यमंत्री उभे आहेत. माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकेत नाही, असा उल्लेख करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अभिजित पवार यांनी ट्विट करत ४ व्हिडिओ शेअर केले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत महोदय हा सहाय्यक आयुक्त जो तुमचा मुलगा म्हणून सगळीकडे मिरवतोय; तो काय बोलतो आहे हे कृपया ऐका. मी स्वतःवर फायरिंर्ग करून घेईन. मग मी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेईन. माझ्या मागे मुख्यमंत्री उभे आहेत.

माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे टविट करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या बाहेर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांनी ट्विट केले आहेत. मात्र, या चारही ऑडिओ क्लिप महेश अहिर यांची असल्याची पुष्टी झाली नाहीये. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर या अधिकाऱ्याला मारहाण केली. या क्लिपबाबत जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला होता. त्यांनी माध्यमांशीही यासंदर्भात संवाद साधला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *