मुंबई । मुंबई महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन खरेदीत ४२ कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला. ५ हजार सॅनिटरी नॅपकिन मशीन मुंबईतील शौचालयात बसवण्यासाठी सरकारने ४० हजारांची मशीन ७० हजारांना खरेदी केल्याचा आरोप परब यांनी केला. त्यानंतर विधानपरिषदेत मंत्री शंभूराजे देसाई आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. देसाई यांनी दिलेले उत्तर चुकीचं आहे, घोटाळा झाल्याचा आमच्याकडे पुरावा असल्याचे परब म्हणाले.
पूर्व इतिहास नसलेल्या कंपनीला चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसेच मंत्री शंभूराजे देसाई विसंगत माहिती देत असल्याचा आरोप करत हक्कभंग आणण्याचा इशारा परब यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेतील कचरा विभागामार्फत सॅनिटरी मिटिंग मशीन बसवण्यासाठी ४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. ज्या कंपनींना हे कंत्राट मिळालं ती कंपनी केंद्रातील आहेत. रियलझेस्ट वेंडकॉन, किरवॉन वेंडसोल, पीआर एंटरप्राईजेस या कंपन्यांची डिसेंबर २०२२ निविदा प्रक्रियेत सहभागी होणे त्याच महिन्यात त्यांना निविदा मिळते. विशषेता त्यांना याच वर्षी मान्यता मिळाली. त्यांना हे ५ हजार मशिन बसवण्याची निविदा काढण्यात आली. विशेषता या मशिनची किंमत ७० हजार दाखवण्यात आली असून बाजारात त्याची किंमत ४० हजार असून निवेदा मध्ये ती वाढवून लावण्यात आली आहे.