मुंबई, दि. १६ प्रतिनिधी शुक्रवारी शेअर बाजाराने सलग दोन दिवसांच्या घसरणीची मालिका तोडली. दोन्ही बेंचमार्क निर्देशांक हिरव्या निशाणावर बंद झाले. सेन्सेक्समध्ये १८८ अंकांची वाढ नोंदवली गेली, तर निफ्टी ५० मध्ये २९ अंकांची तेजी दिसून आली. आयटी क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराला आधार मिळाला असून इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रा हे टॉप गेनर्स ठरले.
शुक्रवारी सेन्सेक्सने ८३,६७० स्तरावर सुरुवात केली आणि दिवसअखेर ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह ८३,५७० स्तरावर बंद झाला. तर निफ्टी ५० ने २५,६९६ वर ओपनिंग दिली आणि दिवसअखेर ०.११ टक्क्यांच्या घसरणीसह २५,६९४ स्तरावर बंद झाला. बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची कामगिरी संमिश्र राहिली. बीएसई मिडकॅपमध्ये ०.१५ टक्क्यांची वाढ दिसून आली, तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.४५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.
निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ इन्फोसिसमध्ये दिसून आली, त्यात ५.६३ टक्क्यांची तेजी झाली. त्यानंतर टेक महिंद्रामध्ये ५.१७ टक्के, विप्रोमध्ये २.७९ टक्के, एचसीएल टेकमध्ये १.७७ टक्के आणि टाटा कंज्युमरमध्ये १.५२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक घसरण इटरनलमध्ये झाली असून त्यात ३.८६ टक्क्यांची घट झाली. त्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये २.८६ टक्के, सिप्लामध्ये २.५८ टक्के, हिंदाल्कोमध्ये २.१७ टक्के आणि एशियन पेंट्समध्ये २.०३ टक्क्यांची घसरण झाली.
सेक्टोरल निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटीमध्ये ३.३४ टक्के, निफ्टी कॅपिटल मार्केटमध्ये १.२९ टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत १.१६ टक्के, निफ्टी बँकेत ०.८६ टक्के, निफ्टी ग्रोथ सेक्टरमध्ये ०.५५ टक्के, निफ्टी सर्व्हिसेस सेक्टरमध्ये ०.४९ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत ०.४५ टक्के, निफ्टी रिअल्टीमध्ये ०.३५ टक्के आणि निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ०.२८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली; तर निफ्टी फार्मामध्ये १.२८ टक्के, निफ्टी एनर्जीमध्ये ०.८० टक्के, निफ्टी इंडिया टुरिझममध्ये ०.७४ टक्के, निफ्टी इंडिया कंज्युमरमध्ये ०.६९ टक्के, निफ्टी इंडिया डिफेन्स व निफ्टी मेटलमध्ये प्रत्येकी ०.५३ टक्के, निफ्टी ऑटोमध्ये ०.४५ टक्के आणि निफ्टी मीडियामध्ये ०.३५ टक्क्यांची घसरण झाली.




