आश्रमसह शंभर एकरात होणार पार्किंग
पोलीस विभागाकडून सहकार्याची भावना
अध्यक्ष रवींद्र गायधने, पदाधिकारी, संचालक व पत्रकार
मौदा: गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परमात्मा एक मानव धर्म आश्रम येथे सोमवार२६ जानेवारी करण्याचे ठरविण्यात आले आहे. आश्रमसह शंभर एकरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली व पोलीस विभागाला पत्र देऊन सहकार्याची भावना व्यक्त केली आहे असे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पत्रकार परिषदेत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने, उपाध्यक्ष देवराव तुमसरे, सचिव किरण राऊत, सहसचिव प्रदिपकुमार चौधरी, कोशाध्यक्ष सुभाष दहिकर, संचालक तापेश्वर वैद्य, ईश्वर चिचघरे, रवींद्र खापरे, रमेश नखाते, रामेश्वर जोगी, महेंद्र गुरुबेले, टिकाराम पराते, गुलाब साठवणे, सुरेश कळंबे, हेमराज शिंदेकर मार्गदर्शक कीर्तीवान जीभकाटे, नरहरी व्यनकटकर शरद लांजेवार व अनेक मार्गदर्शक, व्यवस्थापक खुशाल जगनाडे, कैलास लांजेवार, पांडुरंग शेंडे व पत्रकार, दिनेश पत्रे, दयाळनाथ नानवटकर,पुरुषोत्तम डोरले, संजय गिरडे, संतोष सेलोटे, अजय मते, तुकाराम लुटे, छबीलाल गिऱ्हेपुंजे, बंडू वैरागडे, महेंद्र चकोले, रघुनाथ शहारे उपस्थित होते.
भारत देशातून येणार सेवक
महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो सेवकांना अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे दुःखी गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय देऊन निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर चे संस्थापक व सेवकांचे सतगुरू महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणी प्रमाणे मार्गदर्शना नुसार जनजागृती करीत्ता दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक हवन कार्य, झेंडावंदन,, मानव धर्म भव्य सेवक मेळावा व सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी सांगितले
सोमवार २६ जानेवारीला होणारे कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ७.३० वाजता हवनकार्य
सकाळी १०.०० वाजता झेंडावंदन कार्यक्रम
सकाळी १०.३० वाजता भगवान बाबा हनुमानजी चे पूजन, महाणत्यागी बाबा जुमदेवजी व वाराणशी आई यांचे स्वागत.
सकाळी ११. ०० भजन कार्यक्रम.
सकाळी १२. ३० वाजता चर्चा सत्र.
सायंकाळी ४. ०० वाजता बक्षीस वितरण व सहभोजन कार्यक्रम.
१७ जानेवारी पासून खेळांना सुरुवात
क्रिकेट स्पर्धा, बुद्धिब स्पर्धा, कबड्डीस्पर्धा, धावणी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आले यांचे बक्षीस सोमवारला कार्यक्रम झाल्यानंतर देण्यात येईल अशी माहिती मंडळाचे सचिव किरण राऊत यांनी दिली.
पोलीस विभाग सहकार्याची भावना पार पडणार काय
आश्रम येथे लाखोच्या संख्येत महाराष्ट्रासह अनेक राज्यातून सेवक येत असतात. दोन चाकी २० रुपये, चार चाकी कार ५० रुपये, बस, ट्रक १०० रुपये यांनी पार्किंग ची पास देण्यात येणार आहे. आश्रमच्या मागच्या बाजूला सुमारे ३० एकरात टेकेपार पुनर्वसन येथे २० एकरात पार्किंगची व्यवस्था केली. परंतु दोन किलोमीटर दूर खाजगी लेआऊट आपली पार्किंग करतात व पासेस che जास्त रक्कम घेऊन आपल्या जागेवर वाहन अडवीतात. त्यामुळे सेवकांना दोन किलोमीटर पायदळ चालत आश्रम पर्यंत यावे लागते. पोलीस विभागाने आश्रम जवळील पार्किंग मध्ये वाहने जाऊ द्यावे जेणे करून सेवकांना त्रास होणार नाही. ही पोलीस विभागाची जिम्मेदारी आहे असे मत मंडळाचे संचालक तापेश्वर वैद्य यांनी व्यक्त केले.
तहसील व पोलीस विभागातर्फे आश्रममध्ये येणाऱ्याची व्यवस्था
मौदा तहसीलदार दत्तात्रय निबाळकर यांची आश्रमला दररोज भेट होत आहे. पोलीस विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभाग व इतर कंपन्या पासून सहकार्य करण्याचे निर्देश सर्व विभागाला दिले आहेत. पोलीस विभागाने पार्किंग ची व्यवस्था पार पाडावी. काही समस्या असल्यास मला कळवावे असे तहसीलदार यांनी सांगितले.
पार्किंगचे जास्त पैसे आकारल्यास पोलीस स्टेशन मौदा येथे तक्रार करावी
पार्किंगचे जास्त पैसे घेतल्यास कारवाई करण्यात येईल
परमात्मा एक मानव धर्म आश्रम पावदौना मौदा येथे पार्किंगची व्यवस्था आश्रमच्या मागच्या बाजूला, टेकेपार पुनर्वसन व इतर ठिकाणी करण्यात आली आहे. काही लेआऊट मालक, शेतकरी आपल्या स्वतःच्या जागेत पार्किंग करीत आहेत त्यांनी ठरवून दिलेल्या मोटार सायकल २० रुपये, कार ५० रुपये,, बस ट्रक १०० रुपये ह्या शिवाय जास्त पैसे आकारले तर मालकावर व पार्किंग घेणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.त्याचप्रमाणे ज्या सेवकांना जास्त पैसे मागणार त्यांनी पोलीस स्टेशन मौदा येथे तक्रार करावी. असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड यांनी सांगितले.




