नागपूर

बलात्काराच्या आराेपीची पाेलिस काेठडीत आत्महत्या

-जरीपटका पाेलिस ठाण्यातील घटना
-वरिष्ठांसह अनेकांवर गदा येणार

बलात्काराच्या गुन्ह्यात जरीपटका पाेलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील हंडीया (जि. प्रयागराज) येथील एका आराेपीने चक्क पाेलिस ठाण्यातील काेठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी सकाळी 6 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नागेंद्रकुमार रामजी भाटिया (19) असे आत्महत्या करणा्र्या आराेपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेंद्रकुमारचे जरीपटका हद्दीत राहणाèया एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसाेबत इंस्टाग्रामवरून ओळख झाली हाेती. माेबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर त्यांच्यात बाेलणे सुरू झाले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दाेघांचीही बाेलचाल हाेत असल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मागील महिन्यात ताे दाेनदा नागपूरला आला आणि मुलीला भेटून गेला. त्यानंतर दाेघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मागील आठवड्यात नागेंद्रकुमार नागपूरला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला. काही दिवस ते प्रयागराज येथे राहिले. इकडे मुलगी घरून बेपत्ता झाल्याने तिच्या आईवडिलांनी जरीपटका पाेलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली हाेती. पाेलिसांनी मुलीच्या माेबाईलचे लाेकेशन काढले असता ते प्रयागराजचे आले. प्रयागराज पाेलिसांच्या मदतीने जरीपटका पाेलिसांनी दाेघांनाही ताब्यात घेतले. नागपूरला आणल्यानंतर पाेलिसांनी नागेंद्रकुमार यास अटक केली. काल बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दाेन दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली. त्यानंतर रात्रभर पाेलिसांनी त्याची चाैकशी केली. घटनेच्या वेळी राहुल नावाचा शिपाई गार्ड ड्युटी म्हणून कार्यरत हाेता अशीही माहिती आहे.

20 मिनिटे विचार केला
गुरूवारी सकाळी पाचच्या सुमारास नागेंद्रकुमार झाेपेतून जागा झाला. अंगावर ओढायला दिलेली चादर त्याने ाडली. शाैचालयातून डबा आणून त्यावर ताे उभा झाला. त्यानंतर ाडलेली चादर पाेलिस काेठडीच्या गजाला बांधली. आत्महत्या करण्यापूर्वी दहा मिनिटे त्याने पाेलिस काेठडीत फेऱ्या मारल्या. शेवटी आत्महत्या करण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर त्याने गळफास घेतला. या 20 मिनिटात एकही पाेलिस कर्मचारी पाेलिस काेठडीकडे िफरकला नाही. अन्यथा नागेंद्रकुमारचा जीव वाचला असता. हे चित्रण पाेलिस ठाण्यातील सीसी कॅमेèयात कैद झाले आहे.

राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक दाखल
या घटनेची माहिती मिळताच राज्य गुन्हे अन्वेशन (सीआयडी) पाेलिसांचे पथक सकाळीच पाेलिस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. सीआयडीच्या पथकाने पाेलिस ठाण्यातील सीसी ुटेज, तपास डायरी, स्टेशन डायरीतीनल नाेंदी ताब्यात घेतल्या. याप्रकरणात जरीपटका ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्यासह, तपास अधिकारी, रात्रपाळी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *