चंद्रपूर

चंद्रपुरात पाचव्यांदा होणार महिलाच महापौर

चंद्रपूर मनपा महापौर ओबीसी महिले साठी राखीव

चंद्रपूर :-चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षणही जाहीर झाले असून चंद्रपूरच्या महापौर पदावर ओबीसी महिला विराजमान होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर चंद्रपूरच्या महापौर पदावर पाचव्यांदा पुन्हा एकदा महिलाच विराजमान होणार असून काँग्रेस तर्फे सुनंदा धोबे आणि संगीता अमृतकर हे नाव सध्या चर्चेत आहेत.
भाजपचा महापौर बसावयाचा झाल्यास भाजपाकडे संगीता खांडेकर आणि अँड. सरिता संदुरकर ही दोन नावे ओबीसी प्रवर्गातून समोर येत आहेत.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा जवळपास होत असल्यामुळे काँग्रेसचा महापौर बसेल असे चित्र सध्यातरी दिसते आहे. त्यामुळे काँग्रेसचा महापौर बसावयाचा झाल्यास खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निकटवर्ती असलेल्या आणि खासदार प्रतिभा धानोरकर ज्या ओबीसी कार्ड वर राजकारण खेळतात त्या ओबीसी कार्ड मधील कुणबी जातीच्या असलेल्या सुनंदा धोबे या या महापौर पदाच्या शर्यतीत बाजी मारतील असे चित्र सध्यातरी दिसते आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *