टॉप स्टोरी महाराष्ट्र

मुंबई महापौर आरक्षण सोडत वरून किशोरी पेडणेकरांचा‌ संताप

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानल्या जात असल्याने महापौर पदावर कोण दावा करणार यासाठी महापौर पदाच्या आरक्षण सोडतवर सर्वांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या सोडतीनुसार मुंबई महानगरपालिका महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी सोडण्यात आले. दोन वेळा सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर पद झालेल्या मुंबईसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण का सोडण्यात आले नाही असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडले असते तर मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे सेना गटाचा महापौर बसला असता. कारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरे गटाचे निवडून आले आहेत. पण येथील महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी सोडल्यामुळे भाजपाचा महापौर पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावर ठाकरे सेना गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी संतप्त सवाल केला आहे की यापूर्वी दोन वेळा सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर झाल्यामुळे यावर्षी अनुसूचित जाती जमातीसाठी हे पद राखीव ठेवायला हवे होते. ही आरक्षण सोडत म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी केलेली तडजोड आहे असे त्यांचे म्हणणे आहे. यावर नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे की ठाकरे सेना गटाचा आक्षेप नियमांना धरून नाही. त्यांचा महापौर बसावा यासाठी आरक्षणासाठी त्यांची चाललेली आरडाओरड आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *