टॉप स्टोरी महाराष्ट्र

महापौर पदाची आरक्षण सोडत_ सत्तास्थापनेचा संघर्ष गतिमान

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदावर आपला दावा करण्यासाठी आरक्षणाच्या सोडतकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर 22 जानेवारीला 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली आणि महापौर पदासाठी अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 1, इतर मागास वर्गासाठी 8 आणि खुला प्रवर्गासाठी 17 अशी महानगरपालिकानिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे महापौर पदासाठीचा सत्तासंघर्ष गतिमान झाला आहे.

29 महानगरपालिकेतील महापौर पदासाठी नशीब आजमावणाऱ्यांचा मार्ग आज झालेल्या आरक्षण सोडतीने मोकळा झाला आहे.या सोडतीत कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर पद आरक्षित झाले आणि कोणत्या महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौर असेल हे स्पष्ट झाले आहे. नव्याने स्थापन केलेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिका वगळता इतर महानगरपालिकांमध्ये कार्यकाळ संपण्याआधी शेवटचे महापौर पदाचे आरक्षण कधी लागू झाले आणि त्याची मुदत कधी संपली याबाबत माहिती घेण्यात आली. महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढण्यात आल्याने या आधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला ठेवण्यात आले. सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यापाठोपाठ 27% आरक्षणानुसार इतर मागास प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. शेवटी खुल्या प्रवर्गासाठी महापौरांची सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडत मध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले होते.
महापालिका निहाय महापौरपदासाठी आरक्षण
1. छत्रपती संभाजीनगरः सर्वसाधारण

2. नवी मुंबईः सर्वसाधारण (महिला)

3. वसई-विरारः सर्वसाधारण

4. कल्याण- डोंबिवलीः अनुसूचित जमाती

5. कोल्हापूरः ओबीसी

6. नागपूरः सर्वसाधारण (महिला)

7. बृहन्मुंबईः सर्वसाधारण (महिला)

8. सोलापूरः सर्वसाधारण

9. अमरावतीः सर्वसाधारण

10. अकोला: ओबीसी (महिला)

११. नाशिक: सर्वसाधारण (महिला)

12. पिंपरी-चिंचवडः सर्वसाधारण (महिला)

13. पुणेः सर्वसाधारण (महिला)

14. उल्हासनगरः ओबीसी

15. ठाणे: अनुसूचित जाती

16. चंद्रपूरः ओबीसी (महिला)

17. परभणी: सामान्य (महिला) (आक्षेप)

18. लातूरः अनुसूचित जाती (महिला)

19. भिवंडी-निजामपूरः सर्वसाधारण (महिला)

20. मालेगावः सर्वसाधारण

21. पनवेलः ओबीसी

22. मीरा-भाईंदरः सर्वसाधारण (महिला)

23. नांदेड- वाघाळाः सर्वसाधारण (महिला)

24. सांगली – मिरज- कुपवाडः सर्वसाधारण

25. जळगावः ओबीसी (महिला)

26. अहिल्यानगरः ओबीसी (महिला)

27. धुळेः सर्वसाधारण (महिला)

28. जालना: अनसूचित जाती (महिला)

29. इचलकरंजीः ओबीसी

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *