नवी मुंबई

४४० झाडे कापून बनणाऱ्या भुयारी मार्गास नागरिकांचा विरोध

नवी मुंबई:नवी मुंबई महानगरपालिकेनेसानपाडा पाम बीच येथे भुयारी मार्गाच्या उभारणी कामाकरता तब्बल ११९ झाडे कापली जाणार आहेत व ३२१ झाडांना स्थलांतरित करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाची नोटीस पाम बीच परिसरात मनपा उद्यान विभागाने लावण्यात आली आहे. सदर भुयारी मार्ग हे अशाप्रकारे पर्यावरणाची हानी करून भुयारी मार्ग बनविण्यास कोणत्या स्वरूपाचा विकास होत आहे असा प्रश्न करून विरोध नोंदवीला आहे.

नवीमुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या तुर्भे विभाग अधिकारी यांना सह्याचे निवेदन सादर करणार असून आपल्या भावना व्यक्त करणार आहे.

सानपाडा पाम बीच परिसर व सर्व्हिस रोडवर खूप चांगल्या प्रकारे झाडांची रांग उभी आहे. त्यामुळे या भागात व्यायाम करणाऱ्यांची व चालणाऱ्यांची वर्दळ असते. झाडांमुळे वातावरण प्रसन्न व स्वच्छ असते. आता भुयारी मार्गाच्या नावावर जर मनपा इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची छाटणी करणार असेल तर येथील रहिवाशी शांत बसणार नाहीत.रहिवाशांनी मनपा सोबत पत्रव्यवहार सुरू केला आहे व सह्यांची मोहीम देखील सुरू केली आहे. गुरुवार २९ जानेवारीला येथील रहिवाशांचे एक शिष्टमंडळ वॉर्ड ऑफिसला भेट देणार आहे व आपले निवेदन देऊन विरोध प्रकट करणार आहे.

विशेष म्हणजे नुकतेच मनपा आयुक्त यांना उच्च न्यायालयाने हवेची गुणवत्ता न राखल्यामुळे फटकारले आहे व त्यांचा पगार देखील रोखला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे म्हणणे मनपा किती गांभीर्याने घेते हे पाहावे ललागणार असून या प्रकल्पला विरोध नसून निसर्गाची हानी होतं असल्याचे नवी मुंबई सिटीझन्स फाउंडेशन अध्यक्ष सतीश निकम यांनी सांगितले आहे.

झाडांच्या कापणी व स्थलांतरणाबाबत नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाचे उप आयुक्त स्मिता काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *