आलेख

हा अपघातांचा योगायोग की सत्तेची काळी सावली ?

हा अपघातांचा योगायोग की सत्तेची काळी सावली
गोपीनाथराव मुंडे गेले,
विनायकराव मेटे गेले,
आज अजितदादा पवार
तीनही घटना रस्त्यावर,
तीनही घटना राज्याच्या राजकारणाला हादरवणाऱ्या अशा आहेत
हा केवळ योगायोग मानायचा का ?
की महाराष्ट्रात सत्ता इतकी निर्दयी झाली आहे की दिग्गज नेतेही आता सुरक्षित नाहीत ?
मुंडे सारखा जनाधार असलेला नेता
दिल्लीच्या रस्त्यावर असुरक्षित कसा ठरतो. ?
मेटेसारखा संघर्षशील आवाज
महामार्गावरच कायमचा का शांत होतो ?
आणि आज अजितदादा सारखा सत्तेचा केंद्रबिंदू,
विमान अपघाताच्या कड्यावर का उभा राहतो ?
प्रश्न हा आहे कि हे अपघात आहेत की घातपात ?
प्रश्न सिस्टमच्या निष्काळजीपणाचा आहे.
प्रश्न नेत्यांच्या सुरक्षेचा आहे.
प्रश्न सत्य दडपलं जातंय का ? याचा आहे,
महाराष्ट्रात जर अपघातच दिग्गज नेत्यांचा शेवट ठरत असेल,
तर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत तरी काय ?
आज आरोप नको,
पण उत्तर हवंय.
कारण इतिहास एक गोष्ट शिकवतो,
सत्ता बदलते, पण प्रश्न दाबले गेले तर
ते उद्या अधिक भयंकर स्वरूपात उभे राहतात.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *