मुंबई

जिल्हाधिकारी ‘सांगली’ची कर्तबगारी:वर्षभरात केलेल्या १५ इतिहासीक प्रयोगाची जागतिक पातळीवर घेतली दखल

नवे विषय, प्रयोग चार पिढ्यांसाठी ठरणार प्रेरणादायी

जगातले ‘प्रयोगशील’ जिल्हाधिकारी ठरले सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे

मुंबई : एखादया जिल्ह्याधिकाऱ्यांनी ठरवले तर, तो आहे त्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. पुढच्या चार पिढ्यांना पुरेल एवढे कामही तो करू शकेल. असेच काहीशे केले आहे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी. काकडे यांच्या कामाचा आदर्श राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी घ्यावा असाच आहे. काकडे यांनी सांगलीमध्ये केलेल्या प्रयोगाची दाखल साता समुन्द्रापार घेतल्या गेली, आणि अवघ्या जगाचे लक्ष सांगलीवर गेले. काकडे यांनी सांगलीमध्ये केलेले ‘ते’ पंधरा विषय विचार करायला भाग पडणारे आहेत.

वंचित, कामगार, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, यांच्या साठी पुढचे चार पिढ्या लक्षात राहील असे काम सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. काकडे यांनी संशोधनाच्या माध्यमातून अगोदर सांगलीच्या चिरंतर विकासाआड येणाऱ्या अडचणी शोधल्या. आणि पुन्हा त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला. जगभरात संशोधनाच्या माध्यमातून चांगले काम पुढे आणणाऱ्या नेचर (युनायटेड किंगडम) आणि सायन्स (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) ह्या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या संशोधन मासिकाने काकडे यांच्या कामाची दखल घेतली आहे.

तर भारतातल्या ‘मुक्ताई सेवादल फाऊंडेशन’ या संशोधन,रिसर्च करणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये काकडे यांनी केलेले सांगितलेले १५ प्रयोग देशासाठी वापरण्यात यावेत अशा सूचना केल्या आहेत. काकडे यांनी केलेलं काम राज्यातल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहल्या जाव्यात अशा सूचनाही केल्या आहेत.

________

सांगलीत कोणते पंधरा प्रयोग यशस्वीपणे साकार केले.

अशोक काकडे यांनी सांगलीत केलेल्या खालील प्रयोगाची जागतिक पातळीवर घेतली दाखल. यामध्ये रिमांड होम व अनाथ आश्रमातील मुलांची सर्वांगीण प्रगती त्यांना ‘स्किलिंग’चे धडे देऊन पायावर उभे केले. एड्सग्रस्त मुलांसाठी राबवलेला संवेदनशील प्रयोग, त्यांचे विवाह घडवून रोजगार दिले. घरची लक्ष्मी आली सातबाऱ्यावर उपक्रमातून महिलांना मालकीहक्काची ओळख हजारो संसार वाचले. घरेलू कामगार महिलांसाठी विशेष आरोग्य मोहीम हजारो महिलांवर उपचार. देहविक्री करणाऱ्या महिलांचा सन्मान व पुनर्वसनाचा मानवी दृष्टिकोनातून केलेला प्रयत्न, त्यांना रोजगार. मुलींसाठी कराटे व आत्मसंरक्षण प्रशिक्षण २० हजार मुलींचा सहभाग. दिव्यांगांसाठी सेवा व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व्यापक अभियान, त्यांच्या रोजगारासाठी पुढाकार. अवयवदान चळवळीला चालना देणारा उपक्रम, शेकडो जणांचे अवयव दान करण्यासाठी पुढाकार. तीन स्पॉट, तीन झाडे सर्व नगरपालिकेत खेळ, आरोग्यासाठी पुढाकार, माझे झाड या पर्यावरणपूरक संकल्पनेची अंमलबजावणी. शेतीचे छोटे रस्ते मुख्य रस्त्याला जोडले, कृषी क्षेत्रातील वेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतातून माल थेट परदेशी बाजारात. दस्तऐवज सुलभीकरणाचा उपक्रम. ‘जिल्हाधिकारी यांचा दरवाजा उघडा’ या लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना. मिरजच्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुढाकार. भविष्यकालीन सांगली अंतर्गत रुरल टुरिझम संकल्पना राबवली. तीन हजार शाळा-कॉलेजमध्ये जाऊन केलेली ‘मी जबाबदार नागरिक बनणार’ या विषयावर व्याख्याने.

_____

अशोक काकडे यांची ‘पूर्वीची’ कर्तबगारी थक्क करणारी

काकडे यांनी नांदेड जिल्हापरिषद सोईओ असतांना महिलांचे आरोग्य, वाचनसंस्कृती, कॉपी मुक्त अभियान हे सर्व पॅटर्न राज्य सरकारने राज्यभर राबविले. दोन पिढ्या वाचवण्याचे, घडवण्याचे काम त्यातून झाले. पुण्यात सिडकोला चीफ ऑफिसर असतांना गरिबांसाठी घरे, या राज्याचा विकसित केलेला प्रयोग काकडे यांचा होता. पुण्यात ‘सारथी’चे एम डी असतांना दोन लाख बहुजनांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यातले दीड हजार पेक्षा जास्त आयपीएस आणि आयएएस झाले. आणि आता सांगलीमध्ये १५ पेक्षा अधिक कामे इतिहास निर्माण करणारी करून दाखवली.
__________

माझे काम मी करत आहे, हे माझे एकट्याचे काम नाही टीम वर्क आहे. माझी नोंद कुणी घेतली कुणी नाही हे मला अजून माहिती नाही, पण गरीब, कामगार कष्टकरी हे आमच्या कामाची नेहमी नोंद घेत असतात. त्यांच्यासाठी सतत आणि चिरंतर टिकणारे काम माझ्या हातून घडावे यासाठी माझी शासनाने नियुक्ती केली आहे, अशी प्रतिक्रिया सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *