वर्धा : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, त्याला शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा ह्या तुटपुंजा असल्या तरी त्या निरंतर असाव्या. पत्रकार बांधवाना सन्मान निधी मिळतो. ज्याप्रमाणे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते आणी त्याच्या मृत्यू पश्चात ही पेन्शन त्याच्या पत्नीला देखील अर्ध्या रकमेच्या स्वरूपात मिळते. त्याच प्रमाणे पत्रकार बांधवाना मिळणारा सन्मान निधी ज्याला आपण पेन्शन म्हणतो हा निधी पत्रकार बांधवाच्या मृत्यू पश्चात पत्रकार मित्राच्या पत्नीला का मिळत नाही? असाच प्रश्न जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले यांनी उपस्थित केला. व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने देवळी येथे आयोजित पत्रकार स्नेहमीलन सोहळा कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पत्रकार स्नेहमिलन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर, देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार राजेश बकाने, देवळीचे नागराध्यक्ष किरण ठाकरे, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस नेते राणा रननवरे, जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, हिंगणघाट नगराध्यक्षा सौ. नयना उमेश तुळसकर, सिंदी रेल्वे नगराध्यक्षा राणी स्नेहल कलोडे, पुलगाव येथील नगराध्यक्षा कविता ब्राह्मणकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे जेष्ठ निरीक्षक मेघल अनासाने, एस एन्ड एस सोलर एनर्जी चे व्यवस्थापक सुनील गुंडे, माजी जी प सदस्या वैशाली येरावार, जेष्ठ पत्रकार आनंद शुक्ला देवळी नगर परिषद उपाध्यक्ष राहुल चोपडा, व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ चौधरी आदी उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले पुढे म्हणाले की, पत्रकार बांधव हे सतत समाजाला आणी समाजातील वंचित पीडित घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. पण याच घटकाच्या बाबतीत शासन आणी समाज इतका उदासीन का आहे? शासनाने सन्मान निधित वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रशंसनिय आहे. पण पेन्शन ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नीला लागू होते त्याच पद्धतीने पत्रकारांच्या पत्नीला देखील हा सन्मान निधी लागू झाला पाहिजे. यासाठी आमदार राजेश बकाने आणी आमदार समीर कुणावर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी अधिवेशनात आवाज उठवतील अशी अपेक्षा कथले यांनी व्यक्त केली आहे.
आमदार समीर कुणावार यावेळी म्हणाले की, लोकप्रतिनिधी चुकत असतील तर त्या चुकावर पत्रकार बांधवानी बोट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या चुका दाखविण्याचे कार्य पत्रकार सतत करीत आले आहे. पत्रकारितेसारखा समाजाचा आरसा असल्यामुळेच लोकप्रनिधीना त्यांच्या चुका कळतात. हिंगणघाट शहरात पत्रकार भवन निर्माण करण्याचा आपला मानस असून लवकरच त्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राणा रणनवरे यांनी पत्रकार बांधवानी संघटित होण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे पत्रकार संघटना महत्वाच्या ठरते आहे असे सांगितले.
देवळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत विकासात पत्रकारितेचे भरीव योगदान असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा तसेच विदर्भात करण्यात आलेल्या सामाजिक कार्याबद्धल “वर्धा दीप सन्मान” हा सन्मान देऊन हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचा गौरव करण्यात आला. तर यावर्षी पत्रकारिता क्षेत्रात आपले जीवन सार्थकी लावणाऱ्या जेष्ठ पत्रकार आंनद शुक्ला यांचा “वर्धा दर्पण सन्मान” देऊन गौरव करण्यात आला आहे. प्राणी मात्राचे रक्षण करणाऱ्याची दखल घेत व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेकडून “वर्धा रक्षक सन्मान” दरवर्षी दिला जातो. यावर्षी पीपल्स फॉर ऍनिमल्सचे आशिष गोस्वामी हे या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे. दरवर्षी दिला जाणारा कला क्षेत्रातील “वर्धा कलारंग सन्मान” हभप गजानन भोरे महाराज (आष्टी शहीद) यांना तर “वर्धा उद्यम सन्मान” देवळी येथील उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांना देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्षांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला आहे. हिंगणघाट नागराध्यक्षा डॉ. नयना उमेश तुळसकर, सिंदी रेल्वे येथील नगराध्यक्षा राणी स्नेहल कलोडे (सिंदी रेल्वे), पुलगाव येथिल कविता ब्राम्हणकर, व किरण ठाकरे (देवळी) यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पत्रकार बांधव सतत रस्त्याने आपल्या दुचाकीने बातमी संकलनासाठी प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणी रस्ता सुरक्षेची गरज लक्षात घेत सदर कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून उपस्थित पत्रकार बांधवाना हेल्मेटचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय एस एन्ड एस सोलर एनर्जीचे व्यवस्थापक सुनील गुंडे यांच्यामार्फत देवळी तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या बावीस सदस्यांचे इन्शुरन्स काढण्यात आले आहे.
याशिवाय उत्कृष्ट पत्रकारीतेसाठी पत्रकार सुनील साबळे आष्टी, धीरज कासारे कारंजा घा., गणेश शेंडे देवळी, पंकज तिवारी पुलगाव, प्रा. अजय मोहड, प्रफुल भटकर देवळी, संतोष तुरक देवळी, चंद्रकांत पवार पुलगाव, मंगेश काळे हिंगणी, निलेश पिंजरकर, प्रमोद पानबुडे, अनुप भार्गव, मोहन सुरकार, अरुण डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. तर कारंजा येथील पंचाहत्तर वर्षीय वृत्तपत्र विक्रेते अजाबराव महादेवराव भोकरे यांना देखील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. कारंजा घाडगे येथील बस स्थानक स्वच्छ करणारे स्वच्छतादूत अशोक ज्ञानेश्वर गोटे आणी मराठी विषयात नागपूर विद्यापीठात सुवर्णं पदक मिळविणाऱ्या कु. निवेदिता फुसाटे हिचा देखील व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने गौरव करण्यात आला. प्रास्ताविक पत्रकार संजय धोंगडे यांनी केले तर संचालन निलेश पिंजरकर यांनी केले. प्रफुल लुंगे यांनी आभार आणले.
कार्यक्रमाच्या याशिस्वीतेसाठी नरेंद्र देशमुख, किशोर कारंजेकर, एकनाथ चौधरी, सचिन धानकुटे, आशिष इझनकर, गणेश शेंडे, संतोष तूरक यांनी प्रयत्न केले.




