वर्धा

हिंगणघाटमध्ये पतंग उडवताना थरारक प्रसंग; विद्युत धक्क्याने १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

मकर संक्रांतीच्या आनंदावर पाणी फेरणारी हृदयद्रावक घटना हिंगणघाट येथील माता मंदिर वार्डात घडली. सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अथर्व बाळबुदे (वय १६) हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली.

पतंग काढण्याच्या प्रयत्नात गच्चीवरील लोखंडी रॉडने पतंग ओढत असताना घराच्या बाजूने जाणाऱ्या जिवंत विद्युत तारेचा रॉडला स्पर्श झाला. स्पर्श होताच अथर्वला जोरदार विद्युत धक्का बसला. या अपघातात त्याच्या उजव्या पायावरील पँटला आग लागून उजवा पाय गंभीररीत्या भाजला गेला.

जखमी अवस्थेत अथर्वला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. या घटनेमुळे पतंग उडवताना विशेषतः गच्च्यांवर आणि विद्युत तारा असलेल्या परिसरात अत्यंत खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून मोठी दुर्घटना टळल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *