वर्धा

पत्रकार सन्मान व स्नेहमिलन सोहळा.!

वर्धा जिल्हा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा देवळीत रविवारी दिमाखदार सोहळा

देवळी : – “लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा..!” या ब्रीदवाक्याला साजेसा पत्रकार सन्मान व स्नेहमिलन सोहळा वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया व व्हिओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, देवळी येथे आयोजित करण्यात आला आहे. देशातील क्रमांक एकची संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या या उपक्रमाकडे जिल्ह्यातील पत्रकार व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी कथले राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ वझुरकर, विनोदबाबू चोरडिया, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, श्यामसुंदर मुंदडा, प्रशांत जवदंड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा विशाखा राजू मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश सचिव राणा रणनवरे, राहुल चोपडा, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, सुनिल मुंढे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख आणि संचालक तथा राज्य संयोजक किशोर कारंजेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

विविध सन्मानांनी होणार गौरव.!
यंदाचा “वर्धा दीप सन्मान” हा हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचा गौरव केला जाणार आहे. “वर्धा दर्पण सन्मान” ज्येष्ठ पत्रकार आनंद शुक्ला यांना प्रदान करण्यात येईल. “वर्धा रक्षक सन्मान” पीपल्स फॉर ऍनिमल्सचे आशिष गोस्वामी, “वर्धा कलारंग सन्मान” हभप गजानन भोरे महाराज (आष्टी शहीद) तर “वर्धा उद्यम सन्मान” उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांना देण्यात येणार आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा विशेष सत्कार.!
जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्षांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यात डॉ. सुधीर भाऊराव पांगुळ (वर्धा), डॉ. नयना उमेश तुळसकर (हिंगणघाट), राणी स्नेहल कलोडे (सिंदी रेल्वे), कविता ब्राम्हणकर (पुलगांव), स्वाती गुल्हाने (आर्वी) व किरण ठाकरे (देवळी) यांचा समावेश आहे.

पत्रकारितेच्या सशक्तीकरणासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारा हा सोहळा ठरणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष एकनाथ चौधरी व देवळी तालुका अध्यक्ष गणेश शेंडे यांनी केले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *