टॉप स्टोरी महाराष्ट्र

बारामतीमधून सुनेत्रा पवार लढणार

मुंबई, दि. १५ प्रतिनिधी:केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकांसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झाले. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.

बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. तर राहुरीच्या जागेवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *