उल्हासनगर , दि . १६ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या काठावर भंगारमाफियानी आपले बस्तान बसवले आहे. दररोज नदीच्या काठावर भंगार जाळुन प्रदुषण पसरवन्याचे काम हे भंगारवाले करत आहेत. तर सी एच एम कॉलेजच्या पुढे नदीच्या काठालगत शासकीय भुखंड आहे , त्या भुखंडावर काही बंगाली भंगार माफियानी कब्जा केला आहे. त्या भंगार माफियाना हटवन्याची मागणी शिवसेनेचे शाखा प्रमुख नाशीर खान यांनी केली आहे.
उल्हासनगर कॅंप ३ येथील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या वालधुनी नदीच्या काठावर शासनाचा मोठा भुखंड आहे. त्या भुखंडावर या पुर्वी काही बांधकाम व्यवसायिकानी अनधिकृत बांधकाम केले होते. परंतु ते बांधकाम महापालिकेने तोडुन टाकले आहे. सदर भुखंड शासनाने ताब्यात घेतला आहे. मात्र त्याच भुखंडावर आता येथील बंगाली भंगारमाफियानी भंगार ठेवुन आपला कब्जा केला आहे. दरम्यान या भुखंडावर भंगारासह त्यांचे वाहने उभी राहत आहेत. तेव्हा शासनाने वेळीच या भंगार माफियाना हटवले नाही , तर पुढील काळात हेच भंगारवाले या भुखंडाचा ताबा घेवुन हक्क बजावु शकतात . तेव्हा शासनाने व महापालिकेने या भंगार माफियांचा बंदोबस्त करुन त्यांची त्या भुखंडावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेचे शाखाप्रमुख नाशीरखान यांनी केली आहे.



