नागपूर

मनपाच्या पाच विशेष समितीच्या सभापतींनी स्वीकारला पदभार

नागपूर, ता. १६: नागपूर महानगरपालिकेचे पाच विशेष समितींच्या नवनिर्वाचित सभापतींनी आज सोमवारी (ता.१६) त्यांच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली. मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते. श्री नरेंद्र बोरकर, माजी महापौर श्री.दयाशंकर तिवारी, माजी आमदार प्रा.अनिल सोले,माजी आमदार श्री विकास कुंभारे यांनी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, जलप्रदय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी परिवहन विभागाच्या सभापती श्रीमती मंगला खेकरे, विधी विशेष समितीच्या सभापती कु. निधी नितीन तेलगोटे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे उपसभापती श्री. प्रदीप पोहाणे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती श्री. श्रीकांत आगलावे ,विधी विशेष समितीचे उपसभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, शिक्षण विशेष समितीच्या उपसभापती श्रीमती भारती बुंदे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घरबांधणी विशेष समितीचे उपसभापती श्री. संदीप गवई, क्रीडा विशेष समितीचे उपसभापती श्री. संजय चावरे, महिला व बालकल्याण विशेष समितीचे उपसभापती श्रीमती तारा (लक्ष्मी) यादव, जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती श्री. विजय (पिंटू) झलके, कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे उपसभापती श्री. सुनिल हिरणवार, नगरसेवक श्री.रामभाऊ आंबुलकर, नगरसेवक श्री. वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह समिती सदस्य, इतर नगरसेवक व सर्व समितींशी निगडीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *