स्मशानभुमीतील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढन्यासाठी महासभेत घेतलेली लक्षवेधी महापौरानी फेटाळली
उल्हासनगर , दि . १९ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथील शांतीनगर स्मशानभुमीत कोणतीही शासकीय परवानगी न घेता डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. तेव्हा हा पुतळा सन्मानपूर्वक काढुन योग्य जागी लावन्यात यावा, म्हणुन डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समिती व अन्याय विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीने महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तर स्मशानातुन डॉ . बाबासाहेब यांच्या पुतळा काढुन योग्य ठिकाणी लावन्यात यावा या मागणीसाठी काल च्या महासभेत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सुरेखाताई सोनवणे यांनी लक्षवेधी आणली होती . परंतु त्या लक्षवेधीवर कोणती ही चर्चा न करता महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी ती लक्षवेधी फेटाळुन लावली आहे. मात्र हा एक प्रकारे जातीयवाद असल्याने आंबेडकरी समाजात संताप व्यक्त होत आहे .
उल्हासनगर कॅंप ३ येथील शांतीनगर स्मशानभुमी मध्ये डॉ . बाबासाहेब यांचा पुर्णाकृती , व्यवस्थितपणे न बनवलेला पुतळा उभारण्यात आला आहे. दरम्यान या स्मशानभुमीत नशेडी व गर्दुल्ले यांचा जास्त वावर असल्याने सदर पुतळ्याचा केव्हा ही अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या स्मशानातील डॉं . आंबेडकर यांचा पुतळा सन्मानाने काढुन योग्य ठिकाणी उभारण्यात यावा अशी मागणी डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समिती चे निमंत्रक शामदादा गायकवाड व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देवुन केली आहे. परंतु त्या निवेदनावर अद्यापपर्यंत कोणती कारवाई झाली नाही.
तेव्हा काल झालेल्या महासभेत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सुरेखाताई सुरेश सोनवणे यांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा सन्मानपुर्वक काढुन योग्य ठिकाणी स्थलांतरीत करावा या मागणी साठी लक्षवेधी आणली . परंतु या लक्षवेधीवर कोणती ही चर्चा न करता महापौर अश्विनी निकम यांनी ती लक्षवेधी फेटाळुन एक प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याची शहरभर चर्चा सुरु आहे . दरम्यान राज्यातील कोणत्याच शहरातील स्मशानभुमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसुन येत नाही. मग उल्हासनगर च्या स्मशानभुमीतच का पुतळा उभारला आहे. यामागे नक्कीच काही हित असणार असल्याची चर्चा सुरु आहे. जर या स्मशानातुन बाबासाहेब यांचा पुतळा काढायच नसेल तर मग सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे उभारुन एक स्मशान म्युझियम तयार करा अशी ही चर्चा रंगत आहे. राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभारायचा असेल तर याला दहा परवानग्या लागतात. तेव्हा या पुतळ्या बाबत कोणती ही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. महापालिकेने स्पष्ट सांगितले आहे की सदर पुतळा महापालिकेने उभारला नसुन कोणती ही परगानगी दिली नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. महापौरानी पुतळ्या बाबतची लक्षवेधी फेटाळुन एक प्रकारे आंबेडकरी समाजाचा अपमान केला असल्याचे दिसुन येते.
महापौराना जिल्हाधिकारी यांचे अधिकार कोणी दिले
उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांनी चेटीचंड निमित्त महापालिका व महापालिकेच्या सर्व शाळाना सुट्टी जाहीर केली आहे. तेव्हा या महापौराना हे अधिकारी कोणी दिलेत किंवा यांना अधिकारी आहेत का? अशी चर्चा होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांचे अधिकार केव्हा पासुन महापौराना देण्यात आले आहेत. या बाबत आयुक्तानीच याचा खुलासा केला पाहिजे. नाही तर शहरातील एखाद्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाला सुध्दा महापौर सुट्टी जाहीर करतील , असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिक विचारत आहेत.




