उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत विविध मुद्यावरून शिवसेना भाजपा मध्ये खडाजंगी ; स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड, तर नऊ विषय समित्या गठीत
उल्हासनगर , दि . १९ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या सर्व साधरण सभेत डम्पिंग ग्राउंड, वालमेनच्या बदली आणि धोकादायक इमारतीच्या मलब्या वरून झालेल्या जबरदस्त खडा्जंगीत शिवसेना आणि भाजपाने स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड केली आहे.
महापालिकेच्या सभागृहात महापौर सौ अश्विनी निकम यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या महासभेत शिवसेनेचे खासदार डॉं . श्रीकांत शिंदे यांचा अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा सुरु असताना मध्येच भाजपाचे नगरसेवक टोनी सिरवानी, नगरसेवक शँकर लुंड यांनी कॅंप पाच येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये आग लागल्याने त्यातून निघणाऱ्या,विषारी धुरा मुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने शिवसेना आणि भाजपा मध्ये चांगलीच खडाजंगी झाली. महापालिका आयुक्तांनी बदली केलेल्या वालमेनच्या प्रश्नावर तसेच धोकादायक इमारती मधुन निघणाऱ्या मलबा या मुद्द्यावरून सेना भाजपा नगरसेवकां मध्ये चांगलीच जुपंली होती. या शिवाय भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी शिवसेना गट नेत्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला, गट नेता शिवसेनेचा की उल्हासनगर विकास आघाडीचा हा प्रश्न वानखडे यांच्या कडून वारंवार विचारल्याने गट नेता अरुण अशान आणि महापालिका सचिव अंनत जवादवार हे चांगलेच अडचणीत सापडले होते . शेवटी राजेंद्र चौधरी यांनी अरुण अशान हे आघाडीचे गट नेते असल्याचे स्पस्ट केले.
महापालिकेत शिवसेना भाजपा सत्तेत असताना मात्र शहराच्या विविध प्रश्नावर भाजपा कडून शिवसेनेला टार्गेट करण्यात येत असल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेका समोर उभे ठाकले होते.
तर या गोंधळात स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. शिवसेनाच्या वतीने नगरसेवक दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, डिम्पल ठाकूर महेश सुखारामणी , विकास खरात, जया माखीजा, राजेंद्र सिंग भुल्लर कुलवन्त सोहता, तसेच भाजपा च्या वतीने राजेश वधारिया, अर्चना करंकाळ, कविता पंजाबी, टोनी सिरवानी, शँकर लुंड, संजय सिंग, राजेश वानखडे आणि रवी जग्याशी यांची निवड करण्यात आली आहे. या शिवाय नऊ विशेष समित्या गठीत करण्यात आल्या असुन त्यात पाणी पुरवठा, महिला बाल विकास, महसूल,सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन, स्वच्छता, परिवहन, शिक्षण,एक अन्य समिती गठीत करण्यात आली असल्याचे घोषित करण्यात आले. दरम्यान महासभेत काही नगरसेवकांच्या वतीने पाण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात वंचित आघाडीचे नगरसेवक विकास खरात यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक 18 मधील चाळीस बोरवेल बंद असून त्या सुरुळीत पणे सुरु करण्यात यावा असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गुढीपाडवा आणि चेटीचंड उत्सवाच्या निमित्ताने उल्हासनगर महापालिका आणि पालिकेच्या सर्व शाळांना महापौर अश्विनी निकम यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याने सिंधी समुदायाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
कल्याण लोकसभाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरच्या विकासकामाना गति देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी दिला त्यांच्या कारकिर्दीत एम एम आर डी ए च्या वतीने सात रस्त्यांचे निर्माण झाले भुयारी गटार योजना राबवण्यात येत आहे, रेल्वेचे विस्तारिकरण उल्हासनगर, विठ्ठलवाडी, शहाड या रेल्वे स्थानकाचा कायापालट, सिंधू भवनचे निर्माण तसेच शहरातील विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल डॉ . श्रीकांत शिंदे यांचा उल्हासनगर महापालिकेच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असून तसा ठराव सभागृहत मंजूर करण्यात आला आहे.



