उल्हासनगर

उल्हासनगर शहर जिल्हा कॉंग्रेस च्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आंदोलन

उल्हासनगर , दि . १२ प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आज प्रांत कार्यालयासमोर उल्हासनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक सिलिंडर हातात घेऊन जोरदार आंदोलन करण्यात आले .

यावेळी सर्वसामान्यानी जगावे कसे ,सिलिंडर विकत घ्यावे कसे , मोदी सरकारचा सामान्य जनतेवर हल्ला , पुन्हा एकदा सामन्यांच्या खिशावर डल्ला !
मोदी सरकार हाय हाय गरिबांनी खावे काय !

अश्या प्रकारचे सूचना फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या असुन त्या नंतर प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर आंदोलनात प्रदेश सचिव कुलदीप ऐलसिंगानी , ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके , नानिक आहुजा , प्रदेश प्रतिनिधी वजिउद्दीन खान , सेवा दल अध्यक्ष शंकर आहुजा , नगरसेविका व गटनेता अंजली साळवे , पुष्पा लता सिंह , मालती गवई , कालिंदी गवई , विजया मोरे , राजेश फक्के ,रजनीकांत शाह , अन्सार शेख , ईश्वर जागियाशी ,मनोहर मनुजा ,हरमीत सिंग, आनंद साले ,आतिश जाधव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *