उल्हासनगर , दि . १२ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचे सेल्फ असेसमेंट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत नागरिकांना सुलभ व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मालमत्तेचे सेल्फ असेसमेंट करण्याची ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे सेल्फ असेसमेंट आता उल्हासनगर महानगरपालिकेच्या या संकेत स्थळावर www.umc.gov.in उपलब्ध सुविधेद्वारे तसेच आरटीएस नियमांनुसार खालील लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही लिंक
https://rtsumc.in/ दिली आहे.
सदर ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना महानगरपालिकेत प्रत्यक्ष येण्याची गरज न पडता घरबसल्या मालमत्तेचे सेल्फ असेसमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व जलद सेवा देणे शक्य होणार आहे.
आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, मालमत्तेचे सेल्फ असेसमेंट करण्यासाठी व संबंधित सेवा मिळविण्यासाठी वरील लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करावा आणि महानगरपालिकेच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा.तेव्हा नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.




