उल्हासनगर , दि . २८ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक ३ फेबृवारी रोजी होणार असल्याची घोषणा कोकण विभागीय आयुक्त यांनी एका पत्रकाद्वारे केली असुन ३० जानेवारी रोजी नामांकन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. तर ३ फेबृवारी ला विशेष महासभा आयोजित केली असुन या महासभेत दोन्ही पदाची निवडणुक होणार आहे . मात्र शिवसेना व भाजपा कडुन अद्याप पर्यंत महापौर व उपमहापौर यांची नावे निश्चित केले नसल्याने पेच निर्माण झाला असुन बहुमताचा आकडा शिवसेने कडे असल्याने महापौर व उपमहापौर हे शिवसेनेचाच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे .
उल्हासनगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ३ फेबृवारी रोजी विशेष महासभेचे आयोजन केले असुन ३० जानेवारी रोजी सचिव कार्यालयात ११ ते ३ पर्यंत महापौर व उपमहापौर पदासाठी नामांकन पत्र दाखल करण्यात येणार आहे . दरम्यान या दोन्ही पदाची निवडणुक रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या देखरेखीत होणार आहे . दरम्यान महापौर पदासाठी शिवसेने कडुन माजी नगरसेवक नरेंद्र कुमारी ठाकुर यांची मुलगी डिंपल ठाकुर यांचे नाव आघाडीवर आहे. तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र सिंग भूल्लर व जमनु पुरस्वानी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सोबतच भाजपा कडुन महापौर पदासाठी रवि जग्यासी यांचे नाव चर्चेत असुन उपमहापौर पदासाठी राजेश वधारिया यांचे नाव पुढे येत आहे .



