उल्हासनगर

उल्हासनदीचे प्रदुषण रोखण्यासाठी 28 जुलै 2025 डीपीआर बनवु म्हणुन घोषणा..मात्र सात महीने झाले अजुन डीपीआर नाही

उल्हासनगर , दि . २७ प्रतिनिधी : गेल्या 9 वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी व ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर व अन्य 80 लाख लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली गेली, परंतु प्रत्येक वेळी शासन व प्रशासनाने लेखी व तोंडी आश्वासने देऊन फसवणूकच केली आहे.

गेल्या वर्षी 22 मार्च 2025 रोजी शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून नदी प्रेमीनी मुंडन करुन आंदोलनाला सुरुवात झाली होती,
1 वर्ष झाले, अजुन मागण्या प्रलंबित आहेत. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका , महापालिका निवडणुकीत भरघोस मते घेतलेल्या लोकप्रतिनिधिना आश्वासनाचा विसर पडला आहे . उल्हास नदीत लागणारे सर्व प्रदूषित सांडपाण्याचे नाले अजुन ही सुरुच आहेत. तर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली नाही, उलट जानेवारी महिन्यातच जलपर्णी ला सुरुवात झाली आहे .

मोहोने बंधाऱ्याच्या काही मीटर अंतरावर अगोदर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा व सद्यस्थितीत असलेल्या मोहोने बंधाऱ्याजवळ सांडपाण्याचा मैला व अशुद्ध केमिकल युक्त गाळ काढण्यात यावा, अशी मागणी पण पूर्ण झाली नाही. म्हारळ नाला, गाळेगाव नाला, मोहिली नाला अजुन ही तसाच उल्हास नदीला येऊन मिळत असुन ते सांडपाणी नदीत जात आहे .

शिरगाव बदलापुर एम आय डी सी तील केमिकल युक्त पाणी अजुन ही उल्हास नदित मिसळत आहे . बदलापुरचे 8 मोठे नाले अजुन ही उल्हास नदी मध्ये येऊन प्रदूषण करत असल्याने या दुषीत पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 22 मार्च 2025 रोजी या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झाले, अजुन उपाययोजना नाही..!! तर
28 जुलै 2025 ला डीपीआर बनवु म्हणुन घोषणा केली परंतु 7 महीने झाले अजुन डीपीआर बनला नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *