उल्हासनगर

उल्हासनगर महापालिका निवडणुकीचे काम करण्यास नकार देणाऱ्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

उल्हासनगर , दि . १४ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची निवडणुक १५ जानेवारी रोजी होत असुन या निवडणुकी मध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना निवडणुकीचे काम दिले आहे . मात्र हे काम करण्यास नकार दिला तर कारवाई करण्याचे संकेत सुध्दा देण्यात आले होते. तेव्हा इन्फंट जिसस स्कूल अंबरनाथ या शाळेच्या मुख्याध्यापकांनी निवडणूक कर्तव्य आदेश घेण्यास नकार दिला असल्याने त्या मुख्याध्यापिकेवर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांनी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार शासकीय निमशासकीय कर्मचारी , शिक्षक कर्मचारी यांना निवडणुकीचे काम दिले आहे . तेव्हा इंफंट जिसस स्कुल अंबरनाथ येथील शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांना सुध्दा निवडणुकीचे काम दिले होते . तेव्हा या शाळेतील मुख्याध्यापिका दिपा एडविन यांनी शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना ही निवडणूक कर्तव्य करण्यास मनाई करून निवडणूक कामामध्ये अडथळा निर्माण केला व निवडणूक अधिकारी तथा आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आदेशाचा अवमान केल्याने इन्फंट जिसस स्कूल अंबरनाथ या शाळेच्या मुख्याध्यापक दिपा यांचे विरुद्ध अजित गोवारी यांच्या तक्रारीवरुन लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 ,1951,1989 कलम 134 अन्वये दिनांक 13/01/2026 रोजी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *