उल्हासनगर

समाजसेवक दिलीप मालवणकर यांचे अश्याही अवस्थेत दातृत्व, रिक्षा चालकाला दिला मदतीचा हात

उल्हासनगर , दि . १७ प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार व समाज सेवक दिलीप मालवणकर यांनी आज आपल्या अनोख्या दातृत्व गुणाचा प्रत्यय दाखवून समाजा पुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे .संपुर्ण घराला आग लागुन त्यामध्ये काही ही शिल्लक राहीले नाही तेव्हा मालवणकर यांनी त्या रिक्षा चालकाला संसारोपयोगी साहित्य देवुन एक मदतीचा हात दिला आहे.

गेल्या पाच फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना जबर मारहाण झाल्याने हात, पाय, छाती व पोटावर मार लागला. तसेच खांद्याचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने गंभीर दुखापत झाली होती.

याही अवस्थेत त्यांना शाळा नं. १४ उल्हासनगर ४ येथील एका रिक्षा चालक पंकज नामदेव बनकर यांचे घरातील फ्रिज चा कॉम्प्रेसर फुटून घरातील सर्व समान, कपडेलत्ते जळून गेले खास झाले असुन ही माहीती मालवणकर यांना समजताच त्यांनी पंकज बनकर या रिक्षाचालकाची अवस्था बघून अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दिलीप मालवणकर यांनी स्वखर्चाने त्यांना,स्वयंपाक घरातील सर्व भांडी, शेगडी, दोन महिने पुरेल इतका किराणा व जीवनपयोगी साहित्य, कुटुंबासाठी कपडे, टॉवेल, चादरी असे साहित्य आज रोजी समितीच्या वतीने श्री रामेश्वर गवई, राजेश फक्के, शशिकांत दायमा, राजेश जगताप आदीच्या हस्ते रिक्षा चालक श्री पंकज बनकर यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केले आहे .
या मदतीमुळे बनकर कुटुंबीय भारावून गेले व त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.त्या मुळे दिलीप मालवणकर स्वतः जखमी असतानाही एका गरीब रिक्षा चालकाच्या कुटुंबीयास जो मदतीचा हात दिला त्याबद्दल मालवणकर यांच्या दातृत्वाची शहरात चर्चा होत आहे. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने मदत दिली नसताना दिलीप मालवणकर यांच्या नेतृत्वाखालील अन्याय विरोधी संघर्ष समितीने हे मानवतावादी कार्य केले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *