उल्हासनगर , दि . २ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची निवडणुक लढवन्यासाठी अनेक इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तेव्हा आज काही अपक्ष उमेदवार व राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी आर्थिक व्यवहार अथवा राजकीय दबावापोटी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सुरु आहे. निवडणुक निर्णय अधिकारी क्र . एक ते सहा मध्ये दाखल असलेले अनेक उमेदवारानी अर्ज आज मागे घेण्यात आले आहेत.
उल्हासनगर महापालिकेची निवडणुक १५ जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीचा तिसरा टप्पा म्हणजे उमेदवारी मागे घेण्याचा दिवस , आज निवडणुक निर्णय अधिकारी क्र . १ ते ६ मध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारानी आपले अर्ज सादर केले होते . यातील छाननी मध्ये २८ उमेदवारी बाद झाले असुन आज अर्ज माघार घेण्याच्या दिवशी आर ओ क्र १ मधील पॅनल क्र . १ ,२ ,३ मधुन २४ उमेदवारानी आपले अर्ज मागे घेतले आहेत.पॅनल क्र . एक मधील शिवसेनेचे ( उबाठा ) मंगल वाघे यांच्या पत्निने आपला उमेदवार अर्ज मागे घेतला असुन पती काम करत नसल्याचे कारण देत माघार घेतल्याचे सांगितले आहे.
दरम्यान आर ओ क्र . ४ .मधील पॅनल क्र . १० , ११ , १२ मध्ये ३६ उमेदवारानी आपले अर्ज मागे घेतले असुन या मध्ये आर पी आय ( अ ) चे पॅनल क्र . १० ( अ ) मधुन दिपा रवि साळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान या निवडणुकीत पत्नि निवडणुक लढवत असताना तिच्या पतीच्या नावावर लाखो रुपये महापालिकेचे टॅक्स व पाण्याचे बील थकीत असताना तिचा उमेदवारी अर्ज वैध ठरवन्यात आला आहे.




