उल्हासनगर , दि . १ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथील आनंदनगर मध्ये खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खासदार निधीतून माता रमाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार तयार होणार असुन या प्रवेशद्वार कामाचे भुमिपुजन महापौर सौ . अश्विनी कमलेश निकम व शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक श्री राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले असुन नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या मागणीनुसार खासदार निधीतुन हे काम होणार आहे.
उल्हासनगर कॅंप ३ येथील आनंदनगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रवेशद्वार होते परंतु ते अतिजीर्ण झाल्याने नव्याने प्रवेशद्वार उभारण्यासाठी नगरसेविका सौ . सविता तोरणे रगडे यांनी खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या कडे निधीची मागणी केली होती. तेव्हा खासदार शिंदे यांनी माता रमाई भीमराव आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रवेशद्वारासाठी निधी मंजुर केला आहे. तेव्हा काल या दोन्ही प्रवेशद्वार कामाचे भुमिपुजन महापौर सौ . अश्विनी निकम व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान महापालिका निवडणुकीत समाजसेवक शिवाजी रगडे यांनी विकास कामाचा नारळ हा पॅनल १२ मधील आनंद नगर मधुन फोडला जाईल असे आश्वासन दिले होते. तेव्हा या दोन्ही प्रवेशद्वार कामाचे भुमिपुजन काल संपन्न झाले आहे.
यावेळी नगरसेवक आकाश चक्रवर्ती , गजानन शेळके, भगवान मोहिते , दशरथ चौधरी ,शिवाजी जावळे , बापू सोनवणे , वैशाली सोनवणे , आदिनाथ पालवे, समाधान प्रधान , साठे सर, रोहित मुळे, अमोल सरदार , शशी भूषण सिंग, नासिर खान, नरेंद्र करोतिया, प्रकाश म्हात्रे , शाहिद मुलानी तथा तमाम प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला . डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवन चे सुध्दा लवकरच काम सुरु करणार असल्याचे आश्वासन शिवाजी रगडे यांनी दिले आहे .



