जेष्ट पत्रकार जोगेंद्र सरदारे यांची संतप्त प्रतिक्रिया
विनोद नक्षीणे व रमेश नक्षीणे या दोन्ही भावाचे सलून चे दुकान पाडले.
भिवापूर (प्रतिनिधी )
नगर पंचायत भिवापूर वतीने गडचिरोली -नागपूर महामार्ग लगतच असलेली बसस्थानक परिसर, एज्युकेशन बॉईज हायस्कुल व नक्षी रोडवरील जवळ पास ५० ते ६० दुकानावर भेदभाव पुर्वक कारवाई करीत बुलडोजर चालविला. त्यामुळे व्यापारी व्यवसाईकात चांगलीच खळबळ माजली आहे. या कारवाई मुळे परिसरातील संबंधित व्यवसाईकाचे हजारो ते लाखो रुपयाचे नुकसान झाले. असू न त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर पडल असून याबाबत मनसे तालुका अध्यक्ष राकेश पौनिकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदिप निबार्ते, माजी नगराध्यक्ष लव जनबधू,माना आदिम जमात मंडळ अध्यक्ष महेश डडमल यांनी नगरपंचायती च्या भेदभाव पुर्वक कारवाई करण्याचा आरोप करीत आपली नाराजी व्यक्त करीत नालीच्या पलीकडील व्यवसाईकाचे अतिक्रमण पाडल्याने नगरपंचायत कारवाई बाबत प्रश्न उपस्थित केले आहे.
श्री जोगेंद्र सरदारे
सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ट पत्रकार
यांनी अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई केलीच पाहिजे मात्र ही कारवाई करतांना त्यांना वेळ देणे गरजेचे होते. परंतू नगरपंचायत प्रशासनाने तसे न करता त्याचे सामान जप्त करून कारवाई करणे अपेक्षित होते. परंतू त्यांच्या दुकानातील सामानाची बुलडोजर ने अक्षरक्ष : तोडफोड केली. सदर प्रकरण आता न्यायालयीन मार्ग लढून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निर्धार ज्येष्ट पत्रकार जोगेंद्र सरदारे यांनी प्रतिनिधी बोलतांना व्यक्त केला.
पथ विक्रेत्याला वेळ न देता तोळफोड करणे गैर
– प्रतिक्रिया –
सौ. निशा जांभुळे
माजी नगरसेवक नप भिवापूर
नगरपंचायत भिवापूर वतिने आठवडी बाजाराच्या दिवशी अतिक्रमण धारकाविरुद् मोठी करण्यात करण्यात आली होते. यात बऱ्याच व्यवसाईकांनी स्व:ताहून अतिक्रमण हटविण्यासाठी वेळ मागितला होता. परंतु याचे म्हणणे न ऐकता या पथविक्रेत्याचे टिनचे शेड, पाणठेला जेसीपी मशिनच्या सहायाने पाडण्यात आले. यात नगरपंचायत प्रशासनाचे हे मोठे अपयश आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन पथ विक्रेत्याचा व्यवसायात वृद्धी व्हावी म्हणून त्यांना १० हजाराचे रुपयाचे बिनव्याजी कर्ज देते आणि अशाच पथविक्रेत्याचे म्हणणे न ऐकुण घेता अतिक्रमणाची कारवाई केली जाते. सरासर हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे तसेच त्यांच्या माध्यमातून दररोज १० ते २० रुपये नगरपंचायतीला ही मंडळी कर देतात




