उल्हासनगर

देशाचे बजेट उल्हासनगरवाशीयांसाठी लाभदायक ; प्रदीप रामचंदानी

उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचे बजेट नुकतेच सादर केले असुन हे बजेट उल्हासनगर येथील व्यापाऱ्याना लाभदायक असल्याचे भाजपाचे प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकाराना माहीती देताना सांगितले आहे .

देशाचे बजेट नुकतेच सादर झाले आहे . या बजेट मध्ये काय काय सामाविष्ट आहे ही माहीती देण्यासाठी भाजपाचे आमदार कुमार आयलानी व जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . दरम्यान बजेट बाबत माहीती देताना माजी नगरसेवक तथा प्रवक्ते प्रदीप रामचंदानी यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात देशाचा विकास केला आहे . सर्व स्थरातील नागरिकांचा विचार करत बजेट मध्ये अनेक सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत .

१४० कोटी नागरिकाना याचा फायदा होणार आहे . तर उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचे शहर असुन या शहरात गाऊन उद्योग , फर्निचर उद्योग , कपडा उद्योग, जिन्स उद्योगासह इतर लघुउद्योग हे सुरु आहेत . तेव्हा या व्यापाऱ्याना केंद्र शासनाने सादर केलेले बजेट हे लाभदायक असल्याचे सांगितले आहे .देश मोदी यांच्यामुळे महासत्तेकडे जात आहे. बजेट सादर करताना मध्यमवर्गीय यांच्यासह गोरगरीबांचा विचार प्रथम होत आहे. याच बजेटच्या माध्यमातुन व्यापारी वर्ग यांना आपला व्यापार चांगला करणार असल्याचे रामचंदानी यांनी सांगितले आहे . यावेळी आमदार कुमार आयलानी , भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया , अमित वाधवा , मन्नु गरीब हे उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *