उल्हासनगर , दि . ११ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिका आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती दोन च्या वतीने चौपडा कोर्ट ते विठ्ठलवाडी या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे .
उल्हासनगर शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेत आयुक्त सौ . मनिषा आव्हाळे यांनी बुधवारी सर्व प्रभाग समितीना अतिक्रमण निष्काषित करण्याचे आदेश देताच नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी आज चौपडा कोर्ट ते मोहटा देवी, काजळ पेट्रोल पंप तसेच विठ्ठलवाडी पर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निष्काषित केले आहे. दरम्यान अतिक्रमण वर कारवाई झाल्या नंतर सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात आले असुन रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती श्री शिंपी यांनी दिली आहे. या कारवाईत महापालिकेच्या स्वछता विभागाचे अधिकारी आणि वाहतूक पोलीसांनी सहभाग घेतला होता.




