उल्हासनगर , दि . १३ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असुन प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र खरी लढत शिवसेना भाजपात होणार आहे. रात्रीपासुन घरोघरी जावुन उमेदवार प्रचार करणार आहेत .
उल्हासनगर महापालिकेची निवडणुक १५ जानेवारी रोजी होणार आहे. तेव्हा या निवडणुकीचा प्रचार आज संपलेला आहे. उमेदवारानी आपापल्या रॅली काढुन मतदारांपर्यंत पोहचवन्याचा प्रयत्न केला आहे. उल्हासनगर महापालिकेची निवडणुक ही २० पॅनल नुसार ७८ जागासाठी होणार आहे. यामध्ये भाजपाने ७८ ही जागावर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर शिवसेना साई पक्ष यांनी सुध्दा आपापले उमेदवार उभे केले असुन वंचित बहुजन आघाडी ने सुध्दा आपले उमेदवार दिले आहेत . मात्र खरी लढत शिवसेना भाजपा यांच्यातच होणार आहे . दरम्यान या काटे की टक्कर मध्ये कमी फरकाने दोन पैकी एक बाजी मारणार आहे.
शिवसेनेचे काही पॅनल मजबुत असुन भाजपाचे सुध्दा ठराविक पॅनल आहेत ते सत्तेचे समिकरण जुळवु शकतात . दरम्यान दोन्ही पक्षाचा खरा चेहरा निकाला अंतीच कळणार आहे . १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे . काही प्रभाग संवेदनशील असुन दोन ते प्रभाग अतिसंवेदनशील आहेत त्यामुळे मयदानाच्या दिवशी कोणता अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे . प्रत्येक पॅनल मध्ये पोलिस बंदोबस्त लावलेला असुन मतदान केंद्राची तपासणी करुन योग्य प्रकारे नियंत्रण ठेवन्यासाठी अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत . महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणुक निर्यण अधिकारी सौ . मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शना खाली निवडणुक प्रकिया सुरळीत सुरु आहे .




