कसारा :– कसारा स्थानका बाहेरील रेल्वेच्या मालकीचे नूतन प्रशस्त असे खाजगी प्रवासी वाहतुकी साठीचे वाहनतळ शनिवार दि 7 फेब्रूवारी पासुन अधिकृतरित्या खुले करण्यात आल्याची घोषणा येथील स्टेशन प्रबंधक रोहित उबाळे यांनी केली आहे.
आर पी एफ उपनिरिक्षक समाधान वाहुळकर,ग्रामीण चे पो निरीक्षक सुरेश गावित,रिपाईं कसारा विभागीय अध्यक्ष राजेंद्र उबाळे,पो पाटील अशोक कर्डक,चालक मालक संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अनुक्रमे संतोष कर्डक व गौतम उबाळे,अकील शेख,नगरसेवक रविंद्र उबाळे,गोविंद तळपाड़े,नाशिक स्टैंड चे सईद पठान,जहूर बोरकर आदि मान्यवर तसेच समस्त चालक मालक यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत स्टेशन प्रबंधक श्री रोहित उबाळे यांनी ही घोषणा केली.या बैठकीत स्टैंड ची निगा राखणे,प्रवाशां सोबत सौजन्याने वागणे, फिक्स प्रवासी भाड़े निश्चिती करणे तसेच वाहने शिस्तित पार्क करणे आदि विषयां बाबत मत मतमतांतरे मनोगतांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.बैठकीस उपस्थित अधिका-यांनी चालकांना स्टैण्डवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता बाळगण्याचे आवाहन तर केलेच; शिवाय या पुढे कोणी दोषी आढळल्यास गय केली जाणार नाही अर्थात कठोर कारवाईचा बड़गा उगारला जाईल,असा सज्ज्ड दम देखील भरला.दरम्यान सुसज्ज वाहनतळ मिळाल्याने सर्वच चालक मालकांनी रेल्वे प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले.




