कसारा :— युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ज़ाहिर सभा ठाणे जिल्ह्यात सर्व प्रथम कसारा मिलिंद नगरात 18 फेब्रूवारी 1933 रोजी पार पडली होती; त्या वेळी बाबासाहेबांनी उपस्थित श्रोत्यांना आपले अत्यंत मौलिक विचार ऐकविले होते. या ऐतिहासिक दिनाच्या स्मृतिना उजाळा देण्याचे महत्वपूर्ण काम येथील प्रेरणाभूमी संघटनेचे अध्यक्ष रमाकांत पालवे आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येक वर्षीच्या 18 फेब्रूवारीला जाहिर सभा आणि मनोरंजन कार्यक्रमाच्या माध्यमातून अखंडपणे करीत आहेत.
औरंगाबाद विद्यापीठ नामांतर लढ्याचे अग्रणी प्रणेते आणि ज्वलंत आंबेडकरी विचारसरणीचे व तत्कालीन भारतीय दलित पैंथरचे झुंजार नेते,परखड वक्ते प्रा.जोगेंद्र कवाड़े यांचे चिरंजीव जयदीप कवाड़े यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाची जाहिर सभा कसारा नगरीत होणार आहे; तरी या सभेला शहापुर तालुक्यातील भीम अनुयायांनी आपसांतील मतभेद,पक्षभेद बाजूला सारून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख आयोजक रमाकांत पालवे यांनी केले आहे.



