कसारा :—येत्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त ‘ सिद्धेश्वर मंदिर व रोकडोबा देवस्थान ट्रस्ट,कसारा ‘ यांच्या सौजन्याने दि 8 ते 16 फेब्रूवारी दरम्यान श्रीमद भागवद कथा आणि ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख पदाधिकारी सुनील मैड,तेजस सुताके,स्वप्निल कलंत्रि,ज्ञानेश्वर किर्वे आणि अनंता राशिनकर यांनी दिली आहे.
सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा कथा प्रवक्ते म्हणून वृंदावन धाम,उत्तराखंड चे श्रीसंत लवादास महाराज आणि सप्ताह दरम्यान स्वर सम्राज्ञी अनुराधा पौडवाल या देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच या आठवडाभराच्या कालावधीत ह.भ.प. श्री नामदेव बाबा पुजारी,सिद्धार्थ महाराज पंडित आणि ह.भ.प.रामप्रसाद पुजारी यांचे भक्त गणास मार्गदर्शन लाभणार आहे.या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी या वर्षीचे कमिटी प्रमुख अनिल डवले आणि त्यांचे सहकारी सुधाकर पाटील, पुरुषोत्तम अग्रवाल,सुखदेव चौधरी आदि पार पाडणार आहेत.



