कसारा

जीवनदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सुवर्णपदकासह राष्ट्रीय पातळीवर झेप

कसारा :– जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथील विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाविद्यालयातील कु . प्रसाद पोकळा(एम.ए. भाग १) याने इंटर कॉलेज ४ झोन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून त्याची निवड अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाचा लौकिक अर्थातच अधिक उंचावला आहे.तसेच कु.साई सुंदरे (प्रथम वर्ष कला शाखा – FYBA) ह्याने ही संबंधित स्पर्धेत ५वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ. कैलास कळकटे, तसेच प्राध्यापकानी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *