डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत महापालिकेचे कोणते ही कार्यालय स्थलांतरित करू नये, मनसेची मागणी
उल्हासनगर , दि . २४ प्रतिनिधी : डॉ . बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रात महापालिकेचे कोणते ही कार्यालय स्थलांतरित करू नये व विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी व स्पर्धा परिक्षांची सर्व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत यूपीएससी एमपीएससी क्लासेसच्या माध्यमातून या अभ्यासिकेत अभ्यासासाठी येणाऱ्या गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर उपलब्ध करून द्यावा तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच इतर गोरगरीब मुलांसाठी एम एस सी आय टी , सी सी कोर्सेस मोफत उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसह रस्त्यावर अभ्यास करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी प्रशासनाच्या वतीने सहायक आयुक्त अजय साबळे , नोडल अधिकारी गणेश शिंपी , सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे यांनी मनसे पदाधिकारी व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून यापुढे या अभ्यासिकेत शैक्षणिक विषया व्यतिरिक्त कोणतेही कार्यालय असणार नाही असे आश्वासन देवुनआंदोलन मागे घेण्याची विनंती केली .
यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख , विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, उपशहर अध्यक्ष मुकेश शेठ पलानी , विभागाध्यक्ष अमोल पाटील , अक्षय धोत्रे , कैलास घोरपडे , विकी जिप्सन नटवर वसिटा, प्रशांत संगाळे, सचिन शिरसाठ,यांच्या सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.



