अंबरनाथ , दि २४ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपालिकेतील महासभेच्या बातम्यांचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सभागृहात बसण्याची सोय केली नसताना त्यांना दिलेल्या गॅलरीमध्ये बसूनच बातम्या करायच्या होत्या. मात्र गॅलरीतील स्पीकर बंद असल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकाराना सभागृहात बसन्याची सोय करावी अशी मागणी केली असतानाच शिवसेनेच्या नगरसेविकांनी विरोध करुन त्यांचा वैचारिक मागासलेपणा दाखवुन दिला आहे .
अंबरनाथ नगरपालिकेच्या महासभेचे आयोजन काल केले होते . सभागृहातील स्पीकर सुरु असताना पत्रकार ज्या गॅलरीत बसतात त्या गॅलरीतील स्पीकर बंद होते . त्यामुळे पत्रकाराना वार्तांकन करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती . तेव्हा पत्रकाराना सभागृहातील मागच्या रांगेत बसन्याची मागणी नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केली असता याला नवख्या नगरसेविका पल्लवी संदीप लकडे यांनी विरोध दर्शवला , तेव्हा पत्रकारानी विरोध कणाऱ्या नगरसेवकांचा निषेध केला आहे .
दरम्यान याआधी पालिकेच्या जुन्या सभागृहात पत्रकार मागच्या रांगेतच बसून बातम्या करत होते त्यावेळेस या नगरसेवकांना कोणताही त्रास झाला नाही मात्र आता या नगरसेवकांना नेमका त्रास कोणाचा होतोय, हेच शोधायची वेळ आली आहे.तर सभागृहातील ही वस्तुस्थिती लपवण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न करन्यात येत आहे.



